लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटनेच्यावतीने गुरूवारी तांत्रिक कामगारांच्या विनंती बदलीसंदर्भात अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाजवळ आंदोलन केले.
जळगाव मंडळ अंतर्गत असलेल्या विभागीय कार्यालय जळगामध्ये मागील वर्षी व चालू वर्षात विनंती बदल्यांमध्ये तांत्रिक कामगारांच्या बदल्या काढण्यात आल्या नाही. याबाबत प्रशासनाला वेळीच सूचना देण्यात आली होती. मात्र, तरीही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आली. त्यातच काही कर्मचारी यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या. नंतर केलेल्या बदल्या गैरसोयीच्या ठरवून तसेच काही हेतू ठेवून फेर पदस्थापना आदेश काढण्यात आले. त्यात आर्थिक व्यवहार झाला असून विनंती बदलीपासून कर्मचा-यांना डावलून फेर पदस्थापना आदेश काढण्यात आले असल्याचा आरोप संघटनेने केले आहे. तसेच गुणवंत कामगार पुरस्कारातून सुध्दा कामगारांना डावलण्यात आले असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे. यावेळी आंदोलनात संघटनेचे उपसरचिटणीस आऱ आऱ सावकारे, झोनल सचिव अशोक खडसे, ज्ञानेश्वर सपकाळै, पी.एस.सपकाळे, विजय मराठे, नीलेश भोळे, अतुल भंगाळे, राजेंद्र झोपे, सुरेखा डोळे, अमोल तायडे, महेश बारी, ज्ञानेश्वर पाटील, सागर पाटील, नरेंद्र परदेशी, समाधान कोळी, आशिष पटेल, अनिल सपकाळे आदींचा समावेश होता.