शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पाडळसरे धरणस्थळी शेतकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:32 IST

पूर्वसूचना न देता पाईपची प्लेट काढण्यास विरोध : लेखी आश्वासनानंर आंदोलन स्थगित

अमळनेर, जि.जळगाव : गेल्या २० वर्षांपासून अपूर्णावस्थेतील पाडळसरे धरणात १३९ तलांकापर्यंत झालेल्या कामामुळे साठणारा दोन टीमसी जलसाठा उन्हाळ्यात कायम रहावा म्हणून पाणी उपसा करून बागायती करणाºया परवानाधारक शेतकºयांकडून गुरुवारी पाडळसरे धरणस्थळी गेट नंबर १२ वर आंदोलन छेडण्यात आले. मात्र पाणी उन्हाळ्यात कमी होणार नसल्याचे लेखी पत्र मिळाल्याशिवाय गेट नंबर १२ व १८ चे पाईपांच्या प्लेट काढू देणार नाहीत या अटीवर ठाम होते. याबाबत उपकार्यकारी अभियंता व्ही.एस.ठाकूर यांनी पाणी पातळीवर परिणाम होणार नाही व पाईप मोकळे केले तरी पाणी उपलब्धतेसाठी उपाययोजना करू, असे लेखी पत्र दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.पाडळसरे धरणाचे गेल्या २० वर्षांत एकूण २३ वक्राकार गेट बसवण्याच्या काँक्रिट कामाचे १३९ तलांकापर्यंत काम करण्यास आले आहे. त्यात गेट नंबर १२ व १८ च्या मध्ये १३४ च्या पातळीवर दोन्ही प्रस्तावात एक मीटर रुंदीचे पाईप हे भविष्यात काम करण्यास अडचण येणार नाही म्हणून पाणी काढण्यासाठी टाकण्यात आले आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून दरवाजाचे कोणतेच काम करण्यास आले नसून, साईडवॉल व संरक्षण भिंतीचे कामावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. गेल्या मार्च महिन्यापासून धरणाचे किरकोळ बंद आहे. मात्र पावसाळा लांबल्याने धरणातील १२.९७ दशलक्ष घनमीटर जलसाठ्यातून शेकडो एकर शेतजमीन ओलिताखाली येवून बहुतांश शेतकºयांना पाणी उपसा करण्यास परवाना दिला. यामुळे ऊस, केळी, पपई ही बागायती पिके लागवड केली असून, डाळींब व पेरू ही बारमाही फळपिके लागवड केली आहेत. धरणाच्या जलाशयात उन्हाळ्यात पाण्याचा अत्यल्प साठा उपलब्ध असतो. या दोन पाईपची प्लेट काढल्यावर १३९ तलांकावर राहणारे पाणी १३४ मीटर तलांकावर आल्यास पाच मीटर पाणी पातळी कमी होईल. सर्व बागायती पिके उन्हाळ्यात धोक्यात येतील. यासाठी संबंधित विभागाकडून पिके लागवड आधी पूर्वसूचना न देता प्लेट काढण्याचा घाट ठेकेदाराच्या व्यवस्थापकाने केल्याने शेतकºयांनी पाहिले व गावातील अनेक शेतकरी धरणस्थळी पोहोचले आणि अचानक आंदोलन पुकारण्यात आले.याबाबतीत आंदोलक शेतकरी व कार्यकारी अभियंत्या रजनी देशमुख यांच्यात लेखी आश्वासन देऊन उन्हाळ्यात पाणीसाठा उपलब्ध राहण्यास अडचण येणार नाही म्हणून बोलणे झाले. मात्र शेतकरी लेखी आश्वासनावर ठाम राहिल्याने शेवटी उपकार्यकारी अभियंता व्ही.एस.ठाकूर यांच्या सहीचे लेखी आश्वासनाचे पत्र शाखा अभियंता स्वामी यांनी धरणस्थळी आंदोलक शेतकºयांना आणून दिले. तेव्हा आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात रणछोड पाटील, उपसरपंच प्रभाकर पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, भूषण पाटील, संभाजी पाटील, चंद्रकांत पाटील, मनोज पाटील, विकास पाटील, नितीन पाटील, संदीप पाटील, गोपाल पाटील, भिकन पाटील, संजय पाटील, राकेश पाटील, चिंतामण पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.भविष्यात आॅक्टोबरनंतर प्रस्तावाचे काम करण्यास वरिष्ठांकडून सूचना आल्याने तात्पुरत्या स्वरूपात असलेली पाईपाची प्लेट तोडणे गरजेचे आहे. नदीपात्रात जलपातळी वाढल्यावर काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे जलसाठा मर्यादित ठेवून धरण सांडव्याच्या उर्ध्व बाजूस बांध व पोहच रस्ता करून पाणीसाठा मुर्धा पातळीवर राहील. तो शेतकºयांना उपलब्ध करून देऊ.- व्ही.एस.ठाकूर, उपकार्यकारी अभियंता, पाडळसरे धरण

टॅग्स :StrikeसंपAmalnerअमळनेर