शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

सफाई कामगारांचे आंदोलन अखेर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 17:56 IST

बोदवड : पगारवाढीचा तिढा अखेर सुटला, बाराव्या दिवशी सफाई सुरू

ठळक मुद्दे जिल्हाधिकाºयांनी केली यशस्वी मध्यस्थीगेल्या ११ दिवसांपासून काम बंद आंदोलनामुळे बोदवडमध्ये पसरले होते घाणीचे साम्राज्यबाराव्या दिवशी सफाई कामगार दिसले शहरात सफाई करताना

बोदवड, जि.जळगाव : किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचे ठरल्यानंतर येथील नगरपंचायतीच्या सफाई कामगारांनी बाराव्या दिवशी आपले ‘काम बंद’ आंदोलन मागे घेतले आणि बुधवारी सकाळपासून कामगारांनी शहरात सफाईच्या कामाला सुरुवात केली. यासाठी कामगार व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर यशस्वी मध्यस्थी निघाल्यानंतर कामगारांसोबतच बोदवडवासीयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.बोदवड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतरही नगरपंचायतीतील सफाई कामगारांना ग्राम पंचायतीतील कामगारांप्रमाणे ८० रुपये प्रती दिन वेतन मिळत होते. वेतनवाढ करावी मागणीसाठी नगरपंचायतीतील सर्व ५४ सफाई कामगारांनी १ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन पुकारले होते.या दरम्यान मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी कामगारांना अत्यावश्यक सेवा म्हणून कामावर तत्काळ हजर होण्याविषयीही नोटिसा बजावल्या होत्या. परंतु कामगार आपल्या भूमिकेवर ठाम होते. यातूनच साफसफाई होत नसल्याने शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. एवढेच नव्हे तर खुद्द नगरपंचायत कार्यालय परिसरदेखील घाणीच्या साम्राज्याने वेढला गेला होता.यावर मार्ग काढण्यासाठी कामगार व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जळगाव येथे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची भेट घेतली. कामगारांनी आपली बाजू मांडली. जिल्हाधिकाºयांनी मध्यस्थी केली व किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना आठ हजार रुपये वेतनवाढ देण्याविषयी सूचित केले. या अनुषंगाने नगरपंचायतीत ठराव करावा, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले. यावर नगराध्यक्षा मुमताजबी बागवान, नगरसेवक व मुख्याधिकाºयांनी होकार दिला आणि सफाई कामगारांचा वेतनवाढीचा तिढा सुटला.या वेळी सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवक तसेच कामगारांचे प्रतिनिधी मुकादम मनोज छपरीबंद, जवरी मिलादे आदी उपस्थित होते.यशस्वी मध्यस्थी निघाल्यानंतर सफाई कामगारांनी १२ सप्टेंबरपासून शहरातील सफाईच्या कामास सुरुवात केली. गेल्या ११ दिवसात शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. यामुळे कामगारांसोबतच शहरवासीयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.दरम्यान, कामगार बांधवांचे दैवत असलेला श्री रामदेवजी बाबा उत्सवही याच काळात आहे. हा उत्सव ११ ते १९ सप्टेंबर दरम्यान साजरा करण्यात येत आहे आणि नेमका याच काळात पगार नसल्याने कामगारांचेही हाल होत होते. परंतु उत्सव काळात वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लागल्याने कामगारांनी आपल्या दैवताप्रती ऋण व्यक्त केले. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBodwadबोदवड