जळगाव: जिल्ह्यात मुक व कर्णबधीर तसेच दिव्यांगांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी विविध मागण्या देखील करण्यात आल्या.
यावेळी जळगाव जिल्हा मुक - बधिर असोसिएशनच्या पत्रकात म्हटले की, ‘ जिल्ह्यातील मुक-बधिर आणि कर्णबधिरांवर अन्याय होत आहे. याबाबत संघटनेमार्फत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. यासह मुकबधिरांना सुट देणे, तसेच त्यांच्यासाठी शासकीय शाळा सुरु करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.