शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आईची काळजी वाढली, काळजावर दगड ठेवून मुलांना पाठवितात शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

स्टार ९३८ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यासह राज्यात १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले ...

स्टार ९३८

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यासह राज्यात १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तो काही प्रमाणात अजूनही असल्याने पाल्य शाळेत जात असताना आईची काळजी वाढली असून, काळजावर दगड ठेवून मुलांना शाळेत पाठवीत असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गत सात ते आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. दिवाळीनंतर शाळा उघडल्या तरी त्या अल्पावधीसाठीच राहिल्या. नंतर दुसऱ्या लाटेत शाळा पूर्णत: बंद होत्या. मात्र, आता जी गावे कोरोनामुक्त आहेत, अशा गावांमध्ये राज्य शासनाच्या निर्देशानुसार आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आली आहेत. कोरोनाकाळात पाळले जाणारे नियम इमाने- इतबारे पाळली जात असल्याचे पालकांनी सांगितले.

शाळेतून घरी येताच कपडे बदला, अंघोळ करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले. अशा स्थितीत पाल्यांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पाल्य शाळेतून घरी येताच पूर्ण कपडे बदलायचे, स्वच्छता ठेवायची किंबहुना अंघोळ करावी, असा उपक्रम सुरू झाला आहे. विशेष म्हणजे काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून पालकही हा सर्व खटाटोप करीत आहेत. याशिवाय वर्गात असताना कधीही मास्क काढू नये, तोंडाला वारंवार हाताचा स्पर्श होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे नियमही पाळले जात आहेत.

०००००००००००००००

काळजी आहे; पण शिक्षणही महत्त्वाचे आहे

मुलगी नववीत शिक्षण घेत आहे. पुढील वर्ष दहावीचे असेल. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी मुलीचे शिक्षण तेवढेच महत्त्वाचे आहे. शाळा बंद असल्यामुळे हवा तसा अभ्यास झाला नाही.

-माधुरी दुसाने

१५ जुलैपासून मुलगा नियमित शाळेत जात आहे. शाळेत जात असताना मुलाच्या बॅगेत सॅनिटायझर व अतिरिक्त मास्क ठेवून दिले जातात, तसेच गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे मुलाला सांगितले आहे.

-वैषाली महाजन

मुलगी दहावीला आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे वर्ष आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे अभ्यास अपूर्ण राहिला. प्रत्यक्ष शिक्षणामुळे नियमित अभ्यासाला सुरुवात होईल. आरोग्याच्या दृष्टीने मुलगी संपूर्ण नियमांचे पालन करते.

-रंजना पाटील

००००००००००

एकूण शाळा - ७०८

सुरू - ३०६

अद्याप बंद असलेल्या शाळा - ४०२