शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मातेला मुलांनी केले निराधार, मुलीने दिला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 22:30 IST

वयाच्या ७४ व्या वर्षी रस्त्यावर फिरण्याची वेळ : कोचूर येथील दोघे धावले मदतीला

सावदा, ता. रावेर : मुक्ताईनगर तालुक्यातील लोहारखेडा येथील  ७४ वर्षीय वृद्धेला तिच्या दोन्ही मुलांनी वाऱ्यावर सोडले. यामुळे हताशपणे फिरणाºया या वृद्धेला कोचूर येथील कमलाकर पाटील व पंकज पाटील यांनी थोडा आधार देत सावरले. चौकशी अंती मुलांनी आईला सांभाळण्यास ठामपणे नकारच दिला. यानंतर वृद्धेने सांगितल्यानुसर तिच्या मुलीशी संपर्क साधला असता मुलीने मात्र आपल्या आईला आपल्या घरी नेले. मुलांनी नाकारले अखेर मुलींनी स्विकारले अशी ही घटना असून ‘त्या’ निर्दयी मुलांबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला.या घटनेबाबत वृत्त असे की, येथील कोचूर रोडवर एक वयोवृद्ध महिला हताशपणे दिसली असता कोचुर येथील कमलाकर पाटील व पंकज पाटील यांनी चौकशी केली असता तिने सांगितले की, आपल्याकडे शेतीवाडी असून दोन मुले आहेत  माझ्या या मुलांनी मला घराबाहेर काढले आहे, ही सर्व त्यांची कैफियत ऐकून कमलाकर व पंकज पाटील यांनी लागलीच लोहारखेडा येथे संपर्क साधून वृद्धेच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांच्या मुलांनी आईला सांभाळण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे या वृद्धेला रडू कोसळले. तिला सावरतााटीलद्वयींनी खायला देत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार आजीला सावदा पोलिस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्याकडे घेऊन गेले. पोलिसांनीही संपर्क साधला असता त्या दोन्ही मुलांनी तेच उत्तर दिले. यामुळे सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार व कोचुर येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील व पंकज पाटील या सर्वांचे मन अगदी सुन्न झाले. यानंतर आजीबाईंना जळगाव येथील वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र तोच आजीबाईने आपल्या मुलीचे नाव सांगत मला माझ्या मुलीकडे सोडून द्या अशी विनवणी केली त्यानुसार मोहराळा तालुका यावल येथे मुलीला फोन लावला असता मुलगी सावदा येथे येऊन आपल्या आईला सोबत घेऊन गेली.दरम्यान आजीबाईला जेवण देत तिच्यासाठी प्रयत्न करीत मानवतेचे दर्शन घडवण्याचं काम कोचुर येथील कमलाकर पाटील व पंकज पाटील यांनी केले. यासाठी त्यांना पोलिसांचेही सहकार्य लाभले.