शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आई, वडील गावाला, घरात मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:21 IST

जळगाव : आई, वडील अकोला येथे लग्नाला गेलेले असताना इकडे मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ...

जळगाव : आई, वडील अकोला येथे लग्नाला गेलेले असताना इकडे मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री १०

वाजता घडली. हर्षल नितीन गायकवाड (वय १९, रा.जगवाणी नगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मंगळवारी शवविच्छेदन झाल्यानंतर हर्षलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

केबल ऑपरेटर व ब्रोकर असलेले नितीन दगडू गायकवाड यांना तीन मुले होती. स्वप्नील (२१) हा मोठा असून हर्ष व हर्षल हे दोघे जुळे मुले होती. त्यातील हर्षल हा धनाजी नाना चौधरी महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता. सोमवारी अकोला येथे लग्न असल्याने गायकवाड हे पत्नीसह गेले होते. घरी तिघे भाऊच होते. रात्री उशीर झाला तरी हर्षल दिसत नसल्याने त्याने मोबाईलवर संपर्क केला, परंतु होत नव्हता. मित्र तसेच ओळखीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली असता हर्षलची कुठेच माहिती मिळाली नाही. शोधून दमलेलेले दोघे भाऊ घरी आले व सहज वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहून भावाचा थरकाप उडाला. त्याने आई-वडिलांना घटनेची माहिती देऊन हर्षल याला भावाचे मित्र व इतर लोकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे लुकमान तडवी व सहकाऱ्यांनी पंचनामा केला. दरम्यान, वडील नितीन गायकवाड, आई विद्या मंगळवारी सकाळी आठ वाजता शहरात दाखल झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.