शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 11:22 IST

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना

ठळक मुद्दे३१ मार्चपर्यंत जमा होणार रक्कम

जळगाव : शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ रविवारपासून करण्यात आला. याचा जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक शेतकºयांना लाभ मिळणार आहे. जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील कृषी विज्ञान केद्रात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, एन.आय.सी.चे प्रमुख प्रमोद बोरोले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. सुदाम पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.बाहेती, नाबार्डचे श्रीकांत झांबरे,खते तसेच कृषी बियाणे विक्रेते, प्रातिनिधीक स्वरूपात निवड झालेले शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.लाभार्थींची यादी तयार करण्याचे ७९ टक्के काम पूर्णजिल्हा प्रशासनासह कृषी,महसूल, कृषी विज्ञापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम ७९.५२ टक्के पूर्ण झाले आहे. लवकरच पात्र शेतक-यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ. ढाकणे यांनी दिली. शेवटच्या लाभार्थ्यांच्या खात्यात निधी पोहचविण्यासाठी शासन कटिबध्द असुन शेतक-यांच्या खात्यात निधी पोहचविण्यासाठी काही त्रुटी किंवा अडचणी असल्यास लाभार्थ्यांनी ग्रामपातळीवर, तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर तयार करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार करावी असेही आवाहन त्यांनी केले.आवश्यक कागदपत्रेगावपातळीवर पात्र शेतक-यांच्या कुंटूबीयांचे निश्चितीकरण करून लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यासाठी शेतकºयांचे नाव , लिंग , प्रवर्ग, आधारक्रमांक, बँकखाते क्रमांक , आयएफएससी कोड ,मो.क्रं, जन्मतारीख व पत्ता इत्यादी माहिती शेतक-यांनी दयावयाची आहे. तसेच सामाईक कुटूंबातीेल एक सदस्यांनी योजनेचा लाभ बँक खात्यावर अदा करण्यासाठी स्वयं घोषणापत्र दयावयाचे आहे.लाभार्थ्यांची यादी अंतिम झाल्यावर केंद्र शासनाच्या पीएम किसान पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीव्दारे निधी जमा होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या आहेत.२ लाख २७ हजार ७४३ शेतकºयांना मिळणार लाभ२ लाख २७ हजार ७४३ शेतकरी कुंटूबीयांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ पोहचणार असल्याचे माहिती जिल्हा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली. ही योजना राज्यात १ डिसेंबरपासून राबविण्यात मान्यता प्रदान करण्यात आली असून, या योजनेतंर्गत विहित निकषांप्रमाणे ज्या कुटंबाचे (पती, पत्नी व त्याची १८ वर्षाखालील अपत्ये) सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक २ हेक्टर पर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकरी कुंटबियांस २ हजार प्रती हप्ता याप्रमाणे दरवर्षी ३ हप्त्यात सहा हजार रूपयापर्यंत लाभ मिळणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता ३१ मार्च पर्यंत शेतकºयांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.