शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

जिल्ह्यात सव्वा लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढत आहे. आतापर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या १ लाख ३७ हजार १३६ रुग्णांपैकी १ लाख २५ हजार ५३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ९ हजार १४३ ॲक्टीव्ह रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत २ हजार ४६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.५४ टक्क्यांवर पोहोचले असून जिल्ह्याचा मृत्यूदर १.७९ टक्क्यांपर्यत खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

जिल्ह्यात आजपर्यंत १० लाख ६५ हजार ८३८ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १ लाख ३७ हजार १३६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ९ लाख २५ हजार २७० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या १ हजार ६३५ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात सध्या ६ हजार ८७१ रुग्ण होम क्वारंटाईन असून २८१ रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ९ हजार १४३ रुग्णांपैकी ७ हजार ४२१ रुग्ण लक्षणे नसलेले तर १ हजार ७२२ रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.

४ लाख ५२ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ३८ हजार ८४१ नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस तर १ लाख १३ हजार २४७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. सध्या ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी कळविले आहे.

दृष्टिक्षेपात तालुकानिहाय कोरोना स्थिती

तालुका - बाधित रुग्ण- बरे झालेले - उपचार घेत असलेले - मृत्यू

जळगाव शहर- ३२३७४- ३१०१४-८०४-५५६

जळगाव ग्रामीण- ५३७७- ४९२३-३१६-१३८

भुसावळ- १२६८२-११३२७ -१०३२-३२३

अमळनेर- ९०२२-८४९५ -३८६-१४१

चोपडा- १४३६७-१३३७७ -८३०-१६०

पाचोरा- ४८४६- ४२६७ -४५०-१२९

भडगाव- ३५१७-३३५९ -८४-७४

धरणगाव- ५३९९- ४९८० -३१५-१०४

यावल- -४६१०- ४१०३ -३७७-१३०

एरंडोल- ६५९५-६१०० -३८९-१०६

जामनेर-९०६९ -८१३२ -७९२-१४५

रावेर- ६१०६- ५३२८ -६०९-१६९

पारोळा- ४७४१-४४५४ -२४३-४४

चाळीसगाव-८७६३- ७६५४ -९९९-११५

मुक्ताईनगर- ५३३९-४३६९ -८९०-८०

बोदवड-३१३५-२५९९ -४९०-४६

इतर जिल्ह्यातील- ११८९-१०५२-१३७- --