शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

यावल पालिकेच्या मासिक सभेत नगराध्यक्षा-माजी नगराध्यक्ष यांच्यात शाब्दिक खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:24 IST

यावल येथील नगरपालिकेची मासिक सभा नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या अध्यतेखाली सोमवारी पार पडली. सभेच्या पटलावर २० विषय ठेवण्यात आले होते. पैकी एक विषय तहकूब करण्यात आला आहे तर एका विषयावरून नगराध्यक्षा सुरेखा कोळी व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.

ठळक मुद्देगाळे भाडेपट्टा तत्त्वावर देण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्याच्या विषयास घेतली हरकतपाणीपुरवठ्याच्या फिल्टरचा विषय चर्चेत

यावल, जि.जळगाव : येथील नगरपालिकेची मासिक सभा नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या अध्यतेखाली सोमवारी पार पडली. सभेच्या पटलावर २० विषय ठेवण्यात आले होते. पैकी एक विषय तहकूब करण्यात आला आहे तर एका विषयावरून नगराध्यक्षा सुरेखा कोळी व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.सोमवारी येथील पालिकेची मासिक सभा नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या अध्यतेखाली पार पडली. विषय पत्रिकेवरील विषय नं.९ साने गुरूजी माध्यमिक शाळेच्या जीर्ण झालेल्या खोल्या पाडणे, विषय क्र. १२ स्व्च्छ अभियांनातर्गत जनजागृतीसाठी आलेल्या निविदांवर विचार करण्याबाबत, विषय क्र.१५ पालिकेच्या दुकान संकुलनातील गाळे भाडेपट्टा तत्त्वावर देण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्याच्या विषयास माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी जोरदार विरोध केला आहे. यातील स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत जनजागृतीसाठी आलेल्या पैकी कमी दराची जी निविदा आहे ती मंजूर करावी, अशी मागणी पाटील यांनी करून या अभियानासाठी शासनाची किती तरतूद आहे यांची मुख्याधिकाऱ्यांनी सदस्यांना माहिती देणे गरजेचे होते, असे सांगत या विषयास विरोध केला. यावरून हा विषय तहकुब ठेवण्यात आला आहे. तर विषय क्रमांक १८ येथील पाणीपुरवठ्याच्या फिल्टरची पालिकेने केलेल्या साफसफाईच्या कामास कार्योत्तर मंजुरी व प्राप्त निविदांना मंजुरीचा होता. निविदा प्रसिद्धीपूर्वीच फिल्टरची साफसफाई केली असल्याने ते काम बेकायदेशीर असल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे आम्ही विरोधी गटाने केली असल्याचे सांगून त्याची प्रांताधिकाºयांकडून चौकशी होत आह,े त्या चौकशीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही आणि आम्हीच तक्रारदार असल्याने त्या विषयास पाटील यांनी विरोधी गटाचा विरोध असल्याचे सांगितले. यावर उपनगराध्यक्ष मुकेश येवले यांनी सहकार्याची भावना ठेवा. यावर पाटील आणि येवले यांच्यात पालिकेच्या प्रशासकीय कामावरून वाद सुरू असताना नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी पाटील यांना खाली बसा-खाली बसा असा आदेश दिल्याने दोघात शाब्दिक खडाजंगी झाली.सभेत माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे, नगरसेवक शे.असलम शे.नबी, नगरसेविका नौशाद तडवी यांनी चर्चेत सहभाग घेतला.ब्र. संत श्री जगन्नाथ महाराज यांचा १७ वाजता सप्तदश पुण्यतिथी महोत्सवफैजपूर : येथील सतपंथ मंदिर संस्थांचे ११ वे ब्रम्हलीन गदीपती संतश्री जगन्नाथ महाराज यांची १७ वी पुण्यतिथी महोत्सव १३ व १४ डिसेंबर २०१८ रोजी मंदिराचे शेतात समाधी स्थळ येथे होत आहे.कार्यक्रमासाठी जगतगुरु सतपंथाचार्य नांनकदास महाराज, धर्मम्प्रसाद महाराज वाडताल, शास्त्री भक्तिप्रकसदासजी, गोपाल चैतन्य महाराज पाल, मानेकर बाबा शास्त्री सावदा, महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, योगेश्वर उपासनी महाराज अमळनेर, भरत महाराज कुसुम्बा, स्वरूपानंद महाराज डोंगरदे, शकुंतला दीदी, अंकुश महाराज आळंदी, सतपंथ मुखी परिवार महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश पंचक्रोशितील लोकप्रतिनिधि यांची उपस्थिति लाभणार आहे. १३ रोजी संध्याकाळी पाच ते सात ब्र जगन्नाथ महाराज यांची पुण्यतिथि महापूजा, १४ रोजी सकाळी ७.३० वाजता भव्य शोभायात्रा ९.३० ते १० समाधी पूजन सकाळी १० ते १२ संतांचे अमृतवचन व सतपंथ दिनदर्शिका २०१९ चे प्रकाशन होईल सर्वांनी उपस्थिती द्यावी असे आवहान सतपंथ मंदिरचे गादीपती तथा महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले आहे.‘‘सतत १६ वर्षापासून गुरूंचा हा सोहळा अविरतपणे सुरु आहे. परिसरातील सर्व संत महात्मा भाविक येतात सांप्रदायिक समरसतेचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.’’ - महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, फैजपूरखिर्डी येथे सर्पमित्र संजय हंसकर यांची विष प्राशन करुण आत्महत्याखिर्डी, ता.रावेर : खिर्डी खुर्द येथील रहिवाशी सर्पमित्र संजय गोरख हंसकर (३५) यांनी विष प्राशन करुण आत्महत्या केली असता तत्काळ रावेर येथील ग्रामीण रुग्नालयामधे उचाराकरिता नेत असताना ८.४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला असुन कारण समजू शकले नाही. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.बी.बी.बारेला यांच्या खबरीवरुन निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे व पोहेकॉ भास्कर कुलकर्णी तपास करीत आहे .त्यांच्या पश्चात दोन लहान मुले व आई-वडील दोन भाऊ आहे. मयत संजय यांच्या पत्नीने सुद्धा एक महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. मात्र संजय हंसकर यांच्या मृत्युमुळे लहान मुलांवरील आई-वडीलांचे छत्र हरपले आहे.ट्रकच्या जबर धडकेत मोटारसायकलस्वार गंभीर जखमीरावेर : खानापूर उड्डाणपूलानजीकची घटना :रावेर पोलीसात ट्रक चालकाविरूद्ध गुन्हारावेर : गुजरातकडून नया आझादपूर मंडीत ६४ टन लिंबू भरलेल्या ट्रक (एच.आर.- ७३/ए १४४५) ने बºहाणपूरहून रावेरकडे येणाºया मोटारसायकल (क्र.एम.पी.१९/ एम.एच - ८३००) ला जबर धडक दिल्याने चमारसिंग सरदार सिंग (वय ३४) रा. धुलकोट बोरी (मध्यप्रदेश) हा अत्यावस्थेत गंभीर जखमी झाला. तर त्याचा साथीदार कलसिंग हजाºया पावरा (वय ५०) हा किरकोळ जखमी झाला. रावेर-बºहाणपूर दरम्यान खानापूर उड्डाणपुलाचे चढावावर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खानापूर येथील उड्डाणपूलावर बºहाणपूरकडून रावेरकडे येणाºया मोटरसायकलला समोरून येणाºया लिंबूने भरलेल्या ट्रकने जबर धडक दिली असता, चमारसिंग सरदार सिंग (वय ३४) रा.धुलकोट बोरी (मध्यप्रदेश) हा अत्यावस्थेत गंभीर जखमी झाला तर त्याचा साथीदार कलसिंग हजाºया पावरा (वय ५०) हा किरकोळ जखमी झाला. त्यांच्यावर रावेर ग्न्रामीरुग्णालयात डॉ.बी.बी.बारेला यांनी तातडीने औषधोपचार करून त्यास पुढील उपचारार्थ जळगावच्या सामान्य रुग्णालयात रवााना करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच रावेर ठाण्याचे पो.हे.कॉ.श्रीराम वानखेडे, पो.ना.विलास तायडे, हरीलाल पाटील, पो.कॉ.नीलेश चौधरी, चालक योगेश चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमीस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमी चमारसिंग यास पुढील उपचारार्थ जळगावच्या सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षYawalयावल