शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरापूर्वीच लागलेल्या वायरमनचा खांबावरच मृत्यू

By admin | Updated: February 4, 2016 01:08 IST

चाळीसगाव : विजेच्या खांबावर काम करताना वीज प्रवाह अचानक सुरु झाल्याने सागर विजय सूर्यवंशी (वय 25, रा.नेरी ता.पाचोरा) या कंत्राटी वायरमनचा भाजल्यामुळे खांबावरच मृत्यू झाला.

 

चाळीसगाव : विजेच्या खांबावर काम करताना वीज प्रवाह अचानक सुरु झाल्याने सागर विजय सूर्यवंशी (वय 25, रा.नेरी ता.पाचोरा) या कंत्राटी वायरमनचा भाजल्यामुळे खांबावरच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना हिंगोणे खुर्द (ता. चाळीसगाव) येथे 3 रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान घडली. महिनाभरापूर्वीच तो रुजू झाला होता.

सागर हा वाघळी सबस्टेशनमध्ये कार्यरत होता. वाघळी सबस्टेशन अंतर्गत हिंगोणे शिवारातील तितूर नदीकाठी हनुमान मंदिराजवळ असलेल्या विजेच्या खांबावर तो काम करण्यासाठी चढला. त्यावेळी वाघळी सबस्टेशनमधील वायरमन, ज्युनि. इंजिनिअर, कार्यकारी अभियंता हे देखील त्याच्यासोबत होते. दुरुस्तीचे काम सुरु असतानाच त्याला विजेचा जबर धक्का बसला. यात तो गंभीररित्या भाजला व त्याचा मृत्यू झाला.

वायरमनसह ज्युनि.इंजिनिअर, कार्यकारी अभियंता अशा तीन जणांविरुध्द चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सागरच्या मृत्यू झाल्यास समजताच नेरी - वडगाव (पाचोरा) येथील काही युवकांनी वाघळी उपकेंद्रात तोडफोड केली.