शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

माकडाने झडप घालून केले महिलेला ठार

By admin | Updated: August 27, 2016 21:41 IST

रक्षाबंधन साजरा करुन घरी निघालेल्या नवविवाहीतेवर माकडाने अचानक झडप घातल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे

- ऑनलाइन लोकमत
रावेर, दि. 27  - मध्य प्रदेशातील बंभाडा जि बऱ्हाणपूर येथून रक्षाबंधननिमीत्त भावाला राखी बांधून तालुक्यातील बक्षीपूर येथे येण्यासाठी मोटारसायकलवर पतीसोबत निघालेल्या २२ वर्षीय नवविवाहीतेवर माकडाने अचानक झडप घातल्याने ती धावत्या मोटारसायकलवरून खाली कोसळून गंभीर जखमी झाली. अत्यावस्थेत जळगाव येथे उपचारासाठी नेत असताना तिचा वाटेतच करूण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदरची दुर्घटना इंदूर - अमरावती महामार्गावरील शाहपूरनजीकच्या कालूशा बाबा दर्गाहजवळ बुधवारला घडली.
 
रावेर तालुक्यातील बक्षीपूर येथील नवविवाहिता सौ.रूपाली दिपक महाजन (वय-22)ही आपल्या चिमुरडीसह बंभाडा ता. जिल्हा. बऱ्हाणपूर येथे माहेरी रक्षाबंधनसाठी गेली होती. आपल्या भावाला राखी बांधून ती पती दिपक प्रभाकर महाजन याच्यासोबत मोटारसायकलवर घरी परत येत असताना शाहपूर - बऱ्हाणपूर दरम्यानच्या महामार्गावरील कालूशाबाबा दर्गाहजवळ अचानकपणे माकडाने धावत्या मोटारसायकलवर तिच्यावर झडप घातल्याने ती थेट रस्त्यावर खाली कोसळून पडली. तिच्या डोक्यास गंभीर दुखापत होवून मेंदूतून रक्तस्राव सुरू झाल्याने तिला अत्यावस्थेत बऱ्हाणपूरला रूग्णालयात आणले. मात्र तातडीच्या अत्यावश्यक उपचारासाठी तिला जळगाव येथे हलवत असतांना तिचा वाटेतच करूण अंत झाला. ही घटना बुधवारला रात्री उशिरा घडली. 
रावेर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. 
 
अवघ्या दोन वर्षापुर्वीच विवाह झालेल्या या नवविवाहीतेच्या पश्चात पतीसह एक वर्षाची तान्हुली असल्याने समाजमनातून एकच हळहळ व्यक्त होत आहे. बक्षीपूर येथील माजी उपसरपंच प्रभाकर महाजन यांची ती सून तर बंभाडा येथील काशीनाथ देवलाल चौधरी यांची सुकन्या होत. शोकाकुल वातावरणात या नवविवाहीतेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.