शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वि.का.सोसायट्यांमध्ये पैशांचा ठणठणाट

By admin | Updated: April 6, 2017 00:49 IST

कर्जवसुली ठप्प : थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा; वसुली आली ३० टक्क्यांवर

आडगाव ता.चाळीसगाव : गेल्या  दीड महिन्यापासून कर्जमाफीसाठी राजकारण सुरु आहे. आज कर्जमाफी होईल, उद्या होईल अशी अपेक्षा करीत मार्च संपला व एप्रिल महिना सुरु होऊनही शेतकरी अद्यापही विकास सोसायटी, बँकांकडे फिरकलेला नाही असे चित्र दिसत आहे. दरवर्षी ७०-८० टक्के वसुली होत असे. ती यंदा केवळ २०-३० टक्के झाली आहे असे गटसचिव तसेच बँकिंग अधिकाºयांनी सांगितले. मात्र कर्जमाफी होणार नाही म्हणून वसुलीसाठी परिपत्रक काढल्याचेही या अधिकाºयांनी सांगितले.नियमित कर्ज भरणाºयांना लाभ कमी, थकबाकीदार मात्र मजेत नियमित कर्ज भरणाºयांंची संख्या अधिक व लाभ कमी तर  थकबाकीदारांची संख्या कमी  मात्र  त्यांना लाभ जादा असा आजवरचा अनुभव आहे. कारण सर्वसाधारण शेतकरी अल्पभूधारक हा नियमित कर्जपुरवठा घेतो व वेळेवर फेडतो. मोठे व सधन शेतकरी जादा कर्ज घेतात व वेळेवर कर्जफेडही करीत नाहीत. असे शेतकरी थकबाकीदार होतात मग जे थकले त्यांनाच कर्जमाफी होते व जे नियमित हप्ते भरतात त्यांना काहीही लाभ मिळत नाही. यासाठी शासनाने कर्जमाफी केली तर ती सरसकट व्हावी अशीमागणी शेतकरीवर्ग करीत आहे. कर्ज माफ होईल  अशी अपेक्षा रोज शेतकºयांना असून ते आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र मार्च संपून एप्रिल महिना उजाडला  तरी सरकारकडून कोणतीही हालचाल दिसून येत नाही. केंद्राने याबाबत जबाबदारी झटकली असून हात वर केले आहेत. कर्जमाफीचा निर्णय राज्यानेच घ्यावा  असे सांगण्यात आले आहे. यामुळे कर्जमाफीचा निर्णय सध्यातरी अधांतरीच आहे असे म्हणावे लागेल.कर्जपुरवठ्याची मर्यादा वाढवावीकर्जमाफी होणार नाही हे जवळपास निश्चित मानले जात आहे. दरवर्षानुसार यंदाही ३१ मार्चपूर्वी शेतकºयांनी कर्ज भरावे असे परिपत्रकदेखील बँकांकडून, विकास सोसायट्यांकडून काढण्यात आले आले होते. मात्र कर्जमाफी होणार या आशेवर शेतकºयांनी कर्जाचा भरणा करण्यास अनुत्सुकता दाखवली आहे.उत्तर प्रदेश सरकारने शेतकºयांना कर्जमाफीची घोषणा केली. आता महाराष्ट्रातील शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या असून राज्य शासनाच्या भूमिकेकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. एप्रिल महिन्याचा आठवडा संपत आला तरीही शेतकºयांची कर्ज भरण्याविषयी अनास्था दिसून येत आहे. एवढे कर्जवाटप मागील वर्षी सदर सोसायट्यामार्फत शेतकºयांना झाले आहे. गतवर्षी दुष्काळ असूनही सोसायट्यांची वसुली जवळपास ७० टक्के झाली होती. यावर्षी मात्र सरकार व विरोधी पक्षाकडून वारंवार कर्जमाफीची मागणी होत असल्याने शेतकºयांनादेखील यंदा कर्जमाफीची अपेक्षा असल्याने कर्जभरणा मार्चअखेरपावेतो केवळ २० ते ३० टक्केच झाला असे सोसायटींचे  सचिव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.