शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

आई, काम झाले म्हटले अन् महिला टेक्निशियन एसीबीच्या जाळ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : घरगुती मीटर व्यावसायिक न करण्यासाठी दोन वेळा पंधरा हजारांची लाच घेतल्यानंतरही लाचेचा मोह न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : घरगुती मीटर व्यावसायिक न करण्यासाठी दोन वेळा पंधरा हजारांची लाच घेतल्यानंतरही लाचेचा मोह न सुटलेल्या महावितरण कंपनीच्या शोभना दिलीप कहाणे (वय ५६, रा. पवननगर, ममुराबाद रोड, जळगाव) या महिला टेक्निशियनला दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी साडेतीन वाजता रंगेहात पकडले. दीक्षितवाडीतील महावितरणच्या कार्यालयातच ही कारवाई झाली.

जळगाव शहरातील एका ग्राहकाकडे चार भाडेकरु आहेत. त्याचा मीटर एकच आहे. भाडेकरु असल्याने मीटर व्यावसायिक करावे व त्यासाठी दंड आकारला जाईल, असे सांगून महावितरणच्या सीनियर टेक्निशियन शोभना कहाणे यांनी कारवाई टाळण्यासाठी ग्राहकाकडे सुरुवातीला दहा हजारांची मागणी केली. या ग्राहकाने त्याची पूर्तता केली. त्यानंतरही कहाणे यांनी पुन्हा पाच हजार रुपयांची मागणी केली. कटकट नको म्हणून या ग्राहकाने पुन्हा पाच हजार रुपये दिले. त्यानंतरही कहाणे यांचा पैशांचा मोह कमी झाला नाही, त्यांनी या ग्राहकाला पुन्हा दहा हजार रुपये द्यावे लागतील नाही तर दंड आकारू, असा दम भरला. त्यामुळे या ग्राहकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी. एम. ठाकूर यांची भेट घेत तक्रार दिली.

कार्यालयात लावला सापळा

तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक ठाकूर यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता निरीक्षक नीलेश लोधी, दिनेशसिंग पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला पोलीस अमलदार शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदीप पोळ यांच्या पथकाने दीक्षितवाडीतील कार्यालयात सापळा लावला. ठरलेल्या नियोजनानुसार दहा हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच शोभना कहाणे यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आई काम झाले...

लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर सापळा लावलेल्या पथकाने यासाठी इशारा निश्चित केला होता. कहाणे यांनी ही रक्कम स्वीकारताच तक्रारदाराने बाहेर थांबलेल्या पथकाला मोबाईलवर संपर्क करून ''आई, काम झाले'' म्हणून सांगितले आणि तितक्यात दोघंही बाहेर येत असताना पथकाने त्यांना रंगेहात पकडले.