शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मठगव्हाण येथे हाणामारीसह अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:35 IST

पीडित मुलीसह वडील व भावाला मारहाण

अमळनेर : मठगव्हाण येथे पालखी मिरवणुकीत नृत्य करीत असताना अल्पवयीन तरुणीला धक्का मारल्याच्या कारणावरून दंगल उफाळून तरुणीचा विनयभंग केल्याची घटना १४ रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. या प्रकरणी पोलिसात दंगल, विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आले तर चार फरार झाले आहेत.पोसीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील मठगव्हान येथे १४ रोजी दिंडी व पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी ७ वाजता एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या घरासमोर मिरवणूक आली असता ती मुलगीही मिरवणुकीत नाचत होती. त्यावेळी नितीन महेश पवार याने तिचा डावा हात धरत तिला बाजूला नेले व तिच्याशी असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. त्याचवेळी मुलीचे वडील विचारणा करायला गेले असता सोनू दिलभर पवार, महेश आसाराम पवार, बापू आसाराम पवार यांनी मुलीच्या वडिलांना लाथा बुक्क्यांंनी मारहाण केली तर अरविंद कृष्णकांत पवार, विशाल शिवाजी पवार यांनी त्या तरुणीच्या घरात घुसून तरुणी व तिच्या भावालाही मारहाण करून शिवीगाळ केली.तरुणीने रात्री उशिरा अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून नितीन पवार, अरविंद पवार, विशाल पवार, सोनू पवार, महेश पवार, बापू पवार या सहा जणांविरुद्ध भादंवि कलम ३५४ ब प्रमाणे विनयभंग, ४४८, १४३, १४७, ३२३ प्रमाणे दंगल मारहाण, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी तर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू पवार व महेश पवार यांना अटक करण्यात आली असून उर्वरित चार जण फरार झाले आहेत. तपास उपनिरीक्षक चंद्रकांत चातुरे करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव