शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शौचालये ठरलीत रावेरकरांसाठी मॉडेल

By admin | Updated: January 14, 2017 00:55 IST

अनोेखे : शहर हगणदरीमुक्तीसाठी २४ तास वीज, पाणी व संगीताची सोय

रावेर : शहरातील रसलपूर रोड, मंगरूळ दरवाजा व आठवडे बाजार परिसरात बांधण्यात आलेल्या मॉडेल शौचालयापैकी रसलपूर रोडवरील मॉडेल शौचालयास आज शुभारंभ करून महिला-पुरुषांकरिता खुली करून दिल्याची   माहिती मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दिली. रावेरकरांसाठी मॉडेल ठरलेली ही शौचालय २४ तास वीज, पाणी, एफ.एम. रेडिओ संगीत व सफाई कामगारांच्या दिमतीने हगणदरीमुक्तीसाठी आता साहाय्यभूत ठरली असल्याने रामटेक या वैकुंठ धामाच्या मार्गावर हगणदरी करणाºया दोषी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ व ११७ अन्वये थेट फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. शहरातील रसलपूर रोड, मंगरूळ दरवाजा व आठवडे बाजार परिसरात तीन मॉडेल शौचालये उभारण्यात आली आहेत. महिलांसाठी १० शौचासन व पुरुषांसाठी १० शौचासन असलेल्या या मॉडेल शौचालयाच्या मध्यवर्ती भागात सहकुटुंब सफाई कामगारांचे निवासस्थान आहे. २४ तास वीज व पाण्याची उपलब्धता तसेच एफएम रेडिओ संगीत व सीसीटीव्ही कॅमेºयाचे असलेले विशेष लक्ष यामुळे महिला व पुरुषांसाठी ही सार्वजनिक मॉडेल शौचालय सुलभ व उपयुक्त ठरली आहेत. रसलपूर रोडवरील मॉडेल शौचालयाच्या   किमान ४०० ते १००० महिला-पुरुषांनी लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सामान्य जनतेसाठी एवढी सुविधा उपलब्ध असताना काही बेजबाबदार नागरिकांकडून रामटेक या वैकुंठ धामाच्या मार्गावर मुद्दाम उघड्यावर शौचविधी केला जात असून अंत्ययात्रेचे पावित्र्य बिघडवत आहे.  दरम्यान, आठवडे बाजार व मंगरुळ दरवाजा परिसरात पुढील महिन्यात मॉडेल शौचालये खुली करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(वार्ताहर)उघड्यावर  बसणाºयांविरुद्ध कारवाई होणार... उघड्यावर शौचास बसणाºयांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कायदा कलम ११५ व अधिनियम १९५१ चे कलम ११५ व ११७ अन्वये पोलीस बंदोबस्तासह गुन्हे दाखल करण्याची कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी पुष्टी जोडली आहे.