शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेतून मोबाईलची चोरी

By admin | Updated: January 18, 2017 23:30 IST

टोळी सक्रिय : सुरतच्या तरूणाचा मोबाईल लांबविला

जळगाव: धावत्या रेल्वेतून प्रवाशांचे मोबाईल लांबविणारी टोळी पुन्हा सक्रीय झाली असून जळगावात मार्केटींगसाठी आलेल्या एका तरुणाचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविण्यात आल्याची घटना बुधवारी उघड झाली.दिवसभर पोलिसांकडे हेलपाटे मारल्यानंतरही याबाबत गुन्हा दाखल झाला नाही. दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून ही टोळी रेल्वे स्थानक व परिसरात कार्यरत असून याकडे पोलिसांचा कानाडोळा होत असल्याचा आरोप होत             आहे.सुरत येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला असलेले अजय बारसी (रा.सुरत) व शरद पाटील (रा.अमळनेर) हे दोन्ही तरुण मार्केटींग व प्रशिक्षण देण्यासाठी मंगळवारी सुरत-भुसावळ पॅसेंजरने जळगावात आले. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर संध्याकाळी शरद पाटील याच्याकडे अमळनेर येथे जाण्यासाठी ते संध्याकाळी 6.45 वाजता भुसावळ-सुरत पॅसेंजर गाडीत चढत असताना एका चोरटय़ाने अजयच्या खिशातील मोबाईल लांबवला. हा प्रकार लक्षात आला तेव्हा गाडी सुरु झालेली     होती.अनेक प्रवाशांचे लांबवले मोबाईलस्टेशन परिसरातच वास्तव्याला असलेल्या शहरातील तरुणांची एक टोळी येथे कार्यरत आहे. या टोळीने चालत्या गाडीतून अनेक प्रवाशांचे मोबाईल लांबविले आहेत. विशेष म्हणजे दरवाजाजवळ थांबलेले व पायरींवर बसलेल्या प्रवाशांचेच मोबाईल चोरुन ही टोळी पसार होते. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला अमळनेर येथील दिनेश बागडे या तरुणाचा मोबाईल लांबवला होता, तेव्हा चोरटय़ांचा पाठलाग करताना बागडेचा पाय कापला गेला होता तर भुसावळ रस्त्यावरही एक प्रवाशी जखमी झाली होता. लोहमार्ग, रेल्वे सुरक्षा बल व शहर पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले गुन्हेगारच हा प्रकार करतात. असे असतानाही या तिन्ही यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात नाही.पोलिसांचा हद्दीचा वादसकाळी जळगावात यायचेच असल्याने अजय व शरद हे दोन्ही जण संध्याकाळी अमळनेर येथे निघून गेले. सकाळी जळगावात आल्यावर दोघांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. तेथे ठाणे अमलदाराने ही घटना आमच्या हद्दीत नाही असे सांगून लोहमार्ग पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला.त्यामुळे या तरुणांनी लोहमार्ग पोलीस स्टेशन गाठले. तेथे तरुणाकडून हकीकत ऐकून घेत पक्के बील आणल्याशिवाय गुन्हा दाखल करता येणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली. त्यामुळे दिवसभर फिरवाफिरव झाल्यावरही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे अजय व शरद हे दोन्ही तरुण निराश होवून माघारी परतले.