शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलचं स्क्रीन लॉक अपघातात बेततंय जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

वासेफ पटेल लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची वेगमर्यादा ...

वासेफ पटेल

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची वेगमर्यादा वाढली आहे. थोडी जरी चूक झाली, तरी अपघाताला सामोरे जावे लागते. अशीच घटना काही दिवसांपूर्वी साकेगावजवळ महामार्गावर घडली होती. त्यात युवक गंभीर जखमी झाला होता. अपघाताची माहिती युवकाच्या कुटुंबीयांना देताना मदत करणाऱ्यांची तारांबळ उडाली. कारण, त्या युवकाच्या मोबाइलला फिंगर प्रिंट लॉक होते. हाताला रक्त लागल्यामुळे लॉक उघडून फोन लावताना खूप वेळ गेला. एकाने युवकाची ओळख पटवून संबंधित युवकाच्या घरी माहिती दिली, मात्र ओळख पटली नसती तर फार उशीर झाला असता...

मोबाइलमधील आपली माहिती सुरक्षित राहावी, यासाठी अनेक जण मोबाइलला लॉक करतात. त्यात फिंगर प्रिंट लॉक, पॅटर्न लॉक, पासवर्ड लॉक, फेस लॉक असे प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तीसोबत अनुचित घटना घडल्यास त्याला मदतीची गरज असते. यासाठी त्याचे मित्र किंवा नातेवाइकांना वेळीच माहिती देणे गरजेचे असते.

...तर जीवावरही बेतू शकते

अनुचित घटना वा अपघातप्रसंगी मोबाइल लॉक असल्यास घटनास्थळावरील व्यक्तीला अपघातग्रस्ताच्या नातेवाइकांशी संपर्क साधणे अशक्य होऊ शकते. याचा परिणाम हा जीवावरही बेतू शकतो. प्ले स्टोअरमध्ये सरकारी तसेच काही खासगी ॲप उपलब्ध आहेत.

कोणत्या प्रकारचे मोबाइल लॉक वापरतात?

फिंगर प्रिंट लॉक ४५ टक्के

पॅटर्न लॉक २७ टक्के

पासवर्ड लॉक २० टक्के

फेस लॉक ५ टक्के

लॉक न करणारे ३ टक्के

फोनला नको ॲपला करा लॉक

एखाद्या व्यक्तीची व्हॉट्सॲप, फोटो, इतर चॅटमधील माहिती ही खासगी असते. त्यामुळे फक्त अशाच ॲपला लॉक केल्यास फोन लावण्यासाठी कुठल्याही पासवर्डची गरज पडत नाही. त्यामुळे आपला डेटा सुरक्षित राहतोच. सोबतच आपत्कालीन परिस्थितीत मदतीकरिता दुसरी व्यक्ती फोन वापरू शकते.

मोबाइलच्या एसओएसमध्ये मदतीसाठी नंबर सेव्ह केले तरी आपल्याला मदत करायला येणाऱ्या व्यक्तीला एसओएस कसे वापरावे, याची माहिती असावी लागते. ती माहिती नसल्यास मदत मागणे मुश्कील होते. प्रत्येक व्यक्तीच्या मोबाइलमध्ये खूपच खासगी माहिती असतेच, असे नाही. तरी अनेकजण मोबाइल लॉक करतात. यापेक्षा फक्त गरजेचे ॲप लॉक केले, तर अडचणीच्या काळात मोबाइलवरून संपर्क साधणे सोपे होते.

- इमरान शेख, मोबाइल विक्रेते, भुसावळ

एसओएस पद्धतीचा वापर

प्रत्येक मोबाइलमध्ये एमर्जन्सी एसओएस (सेव्ह अवर सोल म्हणजेच मला वाचवा) ही यंत्रणा असते. यात पोलीस, रुग्णवाहिका तसेच आपल्याजवळच्या व्यक्तींचे मोबाइल नंबरदेखील सुरक्षित करता येतात. एखाद्या वाईटप्रसंगी याचा वापर करून मदत घेतली जाऊ शकते.