शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे उद्या चोपडा येथे भ्रमणध्वनी वापसी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST

राज्य सरकारने पाच-सहा वर्षांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजासाठी भ्रमणध्वनी दिलेले आहेत, त्यांची वॉरंटी-गॅरंटी संपलेली आहे. ते वारंवार बंद पडतात, ...

राज्य सरकारने पाच-सहा वर्षांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजासाठी भ्रमणध्वनी दिलेले आहेत, त्यांची वॉरंटी-गॅरंटी संपलेली आहे. ते वारंवार बंद पडतात, हँग होतात. तसेच रेंज प्रॉब्लेम निर्माण होतो. नादुरुस्त झाले तर शासकीय खर्च दोन हजार रुपयांवरच लागतो. दुरुस्ती खर्च सरसकट प्रत्येक नादुरुस्त भ्रमणध्वनी झालेल्या सेविकेस मिळत नाही. त्यामुळे घरचा खर्च करावा लागतो आणि आता तर राज्य सरकारने पोषण आहार ट्रॅकर ॲप इंग्रजीत दिले आहेत. ते बऱ्याच अल्पशिक्षित सेविकांना भरणे जमत नाही. त्यामुळे फजिती होत आहे. मानसिक तणावाखाली नोकरी करावी लागत आहे. म्हणून ते मराठीत असावे, यासाठी महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीने गेल्या तीन महिन्यांपासून बहिष्कार टाकला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही भ्रमणध्वनीवर काम बंद केले आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीने १७ पासून जुने गॅरंटी, वॉरंटी संपलेले भ्रमणध्वनी वापसी आंदोलन सुरू केले आहे.

वर्धा, भंडारा, गोंदिया, परभणी जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी परतही केलेले आहेत. त्या आंदोलनाचा भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातही दि. २३ रोजी चोपडा येथील प्रकल्प १ व प्रकल्प २ कार्यालयांवर सेविकांचे भ्रमणध्वनी परत करण्याचे आंदोलन दुपारी १२ ते २ वाजता होणार आहे. दि. २५ ऑगस्ट रोजी धरणगाव प्रकल्प कार्यालयावरही त्याचवेळेस आंदोलन होईल, असे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अमृत महाजन, तालुकाध्यक्ष वत्सला पाटील, ममता महाजन, प्रेमलता पाटील, आदींनी कळविले आहे.