शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

आमदार आदर्श ग्राम योजना कागदावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2015 23:54 IST

धुळे : जिल्ह्यातील आमदारांना राज्याच्या ‘आमदार आदर्श ग्राम योजने’ बाबत फारसे गांभीर्य नसल्याची बाब समोर आली आहे.

धुळे : जिल्ह्यातील आमदारांना राज्याच्या ‘आमदार आदर्श ग्राम योजने’

बाबत फारसे गांभीर्य नसल्याची बाब समोर आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जारी होऊन जवळपास 4 महिन्यांचा कालावधी उलटला आह़े, परंतु आजर्पयत गावांची नावे कळविण्याची तसदी जिल्ह्यातील पाचपैकी केवळ दोघा आमदारांनी घेतली़ यावरून योजना आणि त्याची अंमलबजावणी याबाबत लोकप्रतिनिधींच्या स्तरावरही उदासीनता जाणवते. त्यामुळे गावांचा विकास कसा होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आदर्श गाव साकारण्यासाठी केंद्र शासनाने 11 ऑक्टोबर 2014 रोजी सांसद आदर्श ग्राम योजना लागू केली आह़े सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यातील विधान मंडळ सदस्यांनीदेखील ग्रामपंचायतींना आदर्श करण्यासाठी राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा शासनाचा विचार होता़ त्यानुसार राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा निर्णय शासनाने 20 मे 2015 रोजी जाहीर केला होता.

या योजनेची अंमलबजावणी सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवरच करण्यात येणार आह़े तसेच प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातून जुलै 2019 र्पयत तीन ग्रामपंचायती आदर्श ग्राम म्हणून विकसित कराव्या, असे अपेक्षित आहे.

गावे निवडीचे निकष

निवडण्यात येणा:या ग्रामपंचायतींची लोकसंख्या किमान एक हजार असावी़ आमदारांना आपल्या स्वत:चे वा पत्नीचे गाव निवडता येणार नाही़ विधानसभा सदस्यांचा मतदारसंघ जर शहरी आणि ग्रामीण भागात विभागला गेला असेल तर ते मतदारसंघाच्या ग्रामीण भागातून ग्रामपंचायतींची निवड करतील़ विधानसभा सदस्यांचा मतदारसंघ जर संपूर्णपणे शहरी असेल तर त्यांच्या सोयीच्या दृष्टीने त्याच जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवड ते करू शकतील़

गावांचा सर्वागीण विकास

योजनेत केंद्र व राज्य शासनाच्या अस्तित्वात असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आह़े त्यामुळे गावांचा सर्वागीण विकास होऊ शकेल़ तसेच निवडलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आमदार निधीतून घेण्यात येणा:या कामासाठी राज्य शासनाकडून जोड निधी देण्यात येणार आह़े योजनेच्या प्रभावी सनियंत्रणासाठी राज्य स्तरावर वेब पोर्टलची निर्मिती करण्यात येईल़

माहितीचा अभाव

आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघातील तीन गावे दत्तक घेऊन त्यांचा कायापालट करण्याचा योजनेचा हेतू आह़े निवडलेल्या गावांची नावे 15 ऑगस्टपूर्वी जिल्हा प्रशासनाला कळविणे आवश्यक होत़े

ही योजना प्रभावीपणे राबविल्यास निश्चित गावांचा अधिक विकास होईल़ गावे निवडताना तेथे विकासाची खरच गरज आहे, अशी गावे निवडणे संयुक्तिक होणार आह़े

दिवी गाव अजेंडय़ावर

शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी दिवी गावाचे पुनर्वसन करण्याचा मनोदय व्यक्त केला़ मूलभूत गरजा याठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आह़े गाव मॉडर्न करणार असल्याचेही ते म्हणाल़े

विकास कामाचे टप्पे

4टप्प्याटप्प्याने दरवर्षी एक याप्रमाणे तिन्ही गावांमध्ये ग्रामपंचायतीची इमारत, शाळा, अंगणवाडय़ा, स्वच्छ पाणीपुरवठा, ड्रेनेज लाइन, रस्ते, ग्रंथालय आदी विविध कामांसाठी आमदार निधीसोबतच राज्याकडून जोड निधीही देण्यात येणार आह़े

4 शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच आमदारांकडून 15 गावांचा कायापालट होणार आह़े पण, त्यासाठी आमदारांनी तत्परता दाखविणे गरजेचे आह़े यासाठी आमदारांचा आता जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा होणे आवश्यक आह़े