शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार शिरीष चौधरींचे भाजपकडून उमेदवारीचे प्रयत्न अन्यथा बसपाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 11:23 IST

दोघांचा वाद तिसऱ्याचा फायदा

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून निवडणूक लढविण्याचे आपले प्रयत्न आहेत. ए.टी. पाटील व स्मिता वाघ यांच्या भांडणात आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्याशी संवाद साधला असल्याची माहिती अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. भाजपने संधी न दिल्यास बसपाला प्राधान्य असेल असेही ते म्हणाले.भाजपकडून जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आल्याने विद्यमान खासदार ए.टी. पाटील हे नाराज आहेत. त्यांनी जिल्हाध्यक्ष व जलसंपदा मंत्री यांच्याबद्दल नाराजीही व्यक्त केली असून आपल्यालाच उमेदवारी मिळावी असे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.दोघांचा वाद तिसऱ्याचा फायदाभाजपातील दोघा नेत्यांमधील वादाची परिस्थिती लक्षात घेऊन अमळनेर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत दोघांच्या भांडणात आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांनी अद्याप निर्णय दिला नसल्याचेही ते म्हणाले.निवडणूक लढविणारचलोकसभा निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर आपण ठाम असून भाजपाने संधी न दिल्यास बसपाकडून निवडणूक लढवू असे ते म्हणाले. तसेही न झाल्यास अपक्ष उमेदवारी असेल असेही चौधरी यांनी सांगितले.उमेदवारी अर्ज नेलालोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या आमदार शिरीष चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्जही नेला. सोमवार किंवा मंगळवारी आपण उमेदवारी अर्ज दाखल करू, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारण