शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरून मारहाणप्रकरणी एकास तीन वर्ष सक्तमजुरी व २३ हजार रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 23:38 IST

किरकोळ कारणावरून मारहाणप्रकरणी एकास तीन वर्ष सक्तमजुरी व २३ हजार रुपये दंड अशी शिक्षा २२ रोजी सुनावली.

ठळक मुद्देयावल न्यायालयाचा निकालगुन्हेगारांमध्ये खळबळ

भुसावळ : यावल येथील धनगर वाड्यात १६ सप्टेंबर २०१७ रोजी आरोपी खटाबाई माधव धनगर, अभिमान धनगर, सागर धनगर व संजय धनगर आदींनी प्रदीप सुकलाल धनगर यास लाकडी दांडग्याने डोक्यावर व शरीरावर लाथाबुक्क्यांनी संगनमताने बेकायदेशीर जमाव जमवून बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्यांना यावल न्यायालयाने वेगवेगळ्या कलमांनुसार दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरीची व २३ हजार रुपये दंड अशी शिक्षा २२ रोजी सुनावली. न्यायमूर्ती डी.जी.जगताप यांनी हा निकाल दिला. यावल न्यायालयाने सातत्याने दुसऱ्या दिवशी आरोपींना शिक्षा दिल्यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.सर्व आरोपींनी किरकोळ कारणावरून फिर्यादी प्रदीप यास बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.याप्रकरणी सरकारी वकील अ‍ॅड.नितीन खरे यांनी सरकारतर्फे एकूण आठ साक्षीदार तपासले. फिर्यादी, साक्षीदार, पंच, वैद्यकीय अधिकारी तसेच तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर यांनी केला होता. सरकारी वकील अ‍ॅड.नितीन खरे यांचा युक्तीवाद प्रभावी ठरला.न्यायालयाने आरोपी सागर संजय धनगर यास भादंवि कलम ३२६ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड तसेच भादंवि कलम १४३ सह १४९ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा, तसेच भादंवि कलम १४८ सह १४९ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.त्याचप्रमाणे आरोपी खटाबाई हिस भादंवि कलम १४३ सह १४९ अन्वये दोन हजार रुपये दंडाची शिक्षा व भादंवि कलम १४८ सह १४९ अन्वये दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.तसेच आरोपी अभिमान धनगर व संजय धनगर यांना भादंवि कलम १४३ सह १४९ अन्वये प्रत्येकी सहा महिने सक्तमजुरीची व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.तसेच आरोपी अभिमान व संजय धनगर यांना भादवि कलम १४८ सह १४९ अन्वये प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरीची व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.एकूण २३ हजार रुपये दंडाच्या रक्कमेतून १५ हजार रुपये फिर्यादी प्रदीप धनगर यास अपील कालावधीनंतर देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.सरकारी वकील नितीन खरे यांना याकामी पैरवी अधिकारी ऊल्हास राणे व केस वॉच अलीम शेख यांनी मदत केली. आरोपींतर्फे अ‍ॅड.जगदीश कापडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयBhusawalभुसावळ