शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

गौण खनिज महिला अधिका:याचा दुर्गावतार

By admin | Updated: May 20, 2017 00:45 IST

रावेर : निंभोरासीम तापी नदीपात्रात सकाळीच पोलीस बंदोबस्तात धडकल्याने खळबळ

रावेर : तालुक्यातील निंभोरासीम, दोधे व अटवाडे येथे तापी नदीपात्रातील वाळूचे ठेके घेऊनही विनापरवाना वाळूची सर्रास अवैध वाहतूक होत असल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने आज सकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास थेट जिल्हा गौण खनिज अधिकारी नीलिमा जाधव यांनी रुद्रावतार दाखवत  निंभोरासीम येथील तापी नदीपात्रातील अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर धडक कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.                    एखादी  महिला तलाठी समजून अवैध वाळूवाहतूक करणा:या  ट्रॅक्टरचालकांनी त्यांना प्रारंभी गुंगारा  देण्याचा प्रय} केला. मात्र त्यांचे वाहन पोलीस बंदोबस्त पाहून अवैध गौण खनिज वाहतूकदारांनी शरण येत त्यांचा दंडात्मक कारवाईचा दंडुका मान्य करून तीन ट्रॅक्टरमालकांनी 27 हजार रुपये दंडाची रक्कम आज जमा केली.   तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्याकडून कारवाईचा दंडुका सुरू असला तरी थेट जळगावहून जिल्हा गौणखनिज अधिकारी नीलिमा जाधव यांनी थेट धडक कारवाई केल्याने स्थानिक महसूल कर्मचारी व अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.  तालुक्यातील तापी नदीपात्रात अटवाडे, दोधे व निंभोरासीम येथील वाळूचा लिलाव झाला असला तरी, लिलावात नमूद केलेल्या वाळूसाठय़ा पलीकडे कित्येक पटीने वाळू तापी नदीपात्रातून ओरबाडून नेण्यासाठी विनापरवाना पावतीखेरीज दररोज रात्री वा भल्या पहाटे अनेक वाहने अवैध गौण खनिज वाहतूक करीत असल्याचे  जिल्हा प्रशासनास दिसून आले.  त्या अनुषंगाने जिल्हा गौण खनिज अधिकारी  नीलिमा जाधव यांनी आज दोन अंगरक्षकांच्या पोलीस बंदोबस्तात आपला मोर्चा थेट  तालुक्यातील तापी नदीपात्रात वळविला. निंभोरासीम येथील तापी नदीपात्र गाठून त्यांना विनापरवाना वाळू वाहतूक करणारी तीन ट्रॅक्टर आढळून आले. संबंधित ट्रॅक्टरचालकांनी महिला तलाठी समजून त्यांना गुंगारा देण्याचा प्रय} केला. मात्र  अंगरक्षक असलेले पोलीस व कारकुनाने  ओळख दाखवताच चालक व मालकांत भंबेरी उडाली. थेट जिल्हा गौण खनिज अधिकारी नीलिमा जाधव या स्वत:च थेट तापी पात्रात दाखल झाल्याने त्यांनी दंडात्मक कारवाईला सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या पडणा:या आकस्मिक धाडींमुळे वाळूची अवैध गौण खनिज वाहतूक करणा:यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.