शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

भाजप बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन- गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 13:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळीच रविवारी खटके

जळगाव - जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध भाजपचे बंडखोर उमेदवार उभे असल्याने त्यांच्यावरील कारवाईच्या मुद्यावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळीच रविवारी खटके उडाले. याबाबत गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली.जिल्ह्यात शिवसेनेचे चार उमेदवार रिंगणात आहेत. या चारही ठिकाणी भाजपचे चार बंडखोर उभे आहेत. याबद्दल आपणास पंतप्रधान मोदी यांच्यासमोर व्यथा मांडण्याची संधी मिळावी, असे गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना सांगितले, मात्र तसे करता येणार नाही, असे महाजन यांनी सांगितल्याने दोघांमध्ये सभास्थळीच जोरदार वाद झाला.जिल्ह्यात शिवसेनेचे चार उमेदवार उभे आहेत. या चारही ठिकाणी भाजपचे बंडखोर उभे आहेत. त्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात स्वत: गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे, चोपड्यातील शिवसेनेच्या उमेदवार लता सोनवणे यांच्याविरुद्ध भाजपाचे जि.प.तील सभापती प्रभाकर सोनवणे, पाचोरा येथे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर अमोल शिंदे हे रिंगणात आहेत. तर पारोळ्यात शिवसेनेचे चिमणराव पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर गोविंद शिरोळे हे रिंगणात आहेत. त्यामुळे या चारही ठिकाणी शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे उपनेते गुलाबराव पाटील यांनी थेट मोदी यांच्याकडेच व्यथा मांडण्याची परवानगी मागितली. त्यावरुन हा वाद झाल्याची माहिती आहे.दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, भाजपने बंडखोर उमेदवारांवर कारवाई करावी, असे पत्र स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिले आहे. तरीही कारवाई होत नाही. युतीसाठी हे योग्य नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव