शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

म्हसाळा धरणातून पाण्याची सर्रास चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 00:26 IST

धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर : पाणी टंचाईचे सावट, कारवाईची मागणी

कुºहाड ता.पाचोरा : कोकडी  शिवारातील म्हसाळा धरण सध्या दुर्लक्षित आहे. या धरणाची दुर्दशा वाढतच  आहे.  यंदा १०० टक्के भरलेले  धरण हे चुकीच्या नियोजनामुळे तसेच प्रचंड पाणी चोरीमुळे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागले आहे. सध्या या धरणात मृतसाठा वगळता आता केवळ १० टक्के जलसाठा असून ३५-४० वीज पंप लावून पाणी चोरी सर्रासपणे केली जात आहे. याचा परिणाम प्रत्येक गावाच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे.  कुºहाड येथे ८-१० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. जर हे धरणातील वीज पंप जप्त केले नाही तर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणारा आहे. याकडे अधिकाºयांनी वेळीच लक्ष दिले नाही तर  नागरिकांसाठी तसेच गुरांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते.धरण भिंतीवर काटेरी झुडुपेया धरणाच्या भिंतीवर झाडांचे अतिक्रमण झाले असून याच्या मुळ्या धरणाच्या भिंतीत खोलवर गेल्या आहेत. यामुळे या भिंतीला कधीही तडा पडू शकतो.  या धरणाचे काम १९७२ मध्ये झाले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी दुरुस्ती करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेता धरणाच्या दुरुस्तीसाठी काही शेतकºयांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दोन वर्षापासून पाठपुरावाही केला आहे. मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.पाटचारी स्वच्छता स्वखर्चानेगावातील शेतकरी व धरणाचा  गेटमन रतन संपत माळी याने गतवर्षी उन्हळ्यात ४० हजार रु. खर्चून धरणापासून १ कि.मी.पावेतो पाटचारीचा गाळ जेसीबीने काढला होता,  परंतु त्याचा मोबदला या शेतकºयाला शासनाकडून मिळालेला नाही. बºयाचशा पाटचारीमधील गाळासह दुरुस्ती, पाईप लिकेज अजूनही बाकी आहे. याकडे त्वरित लक्ष देण्याची  गरज आहे. या धरणावर पाण्याची नवीन विहीर खोदून लवकरात लवकर गावाला ३-४ दिवसाआड  पाणी देऊ तसेच या विहिरीवर  स्वतंत्र डीपी बसवून देण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)यंदा पावसाळयात १०० टक्के भरेलल्ल्या या धरणात सध्या केवळ  १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. धरणावरुन ७०० एकर शेती क्षेत्र कालवा प्रवाहासाठी आहे. यंदा हे पाणी दिवाळीनंतर दोन महिन्यांनी पाटचारीने सोडले असता बरेचसे पाणी चाºयांद्वारे  गळती होऊन  वाया गेले. शेतºयांनी या धरणाच्या पाण्यावर पिकांची लागवड केली परंतु पाणीसाठा संपल्याने ही पिके सुकू लागली आहेत. या धरणाहून कळमसरा, कोकडीतांडा, कुºहा खु।। बु।।, अंबेवडगाव, जोगे अशा गावांना पाणीपुरवठा होतो.  परंतु पाटबंधारे  अधिकाºयांचे दुर्लक्षामुळे जलसाठा हा आरक्षणापेक्षाही एक फूट खाली आहे.  या धरणाची करवसुली प्रत्येक वर्षी १,३०,०००  रु. अशी आहे. एवढा शेती पाण्याचा सारा मिळूनही या धरणाकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष असल्याने हे धरण अखेरची घटका मोजत आहे.