भुसावळ, जि. जळगाव, दि. 1 - शहरातील जळगाव रोडवरील लोणारी समाज मंगल कार्यालयाचे संपर्क कार्यालय अज्ञात माथेफिरूने शनिवारी मध्यरात्री पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला़ एका अज्ञात माथेफिरूने बाटलीत पेट्रोल आणून मंगल कार्यालयातील संपर्क कार्यालयाच्या दरवाजावर टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. दरवाजाचा काही भाग जळून खाक झाला़ सुदैवाने आगीची झळ जास्त प्रमाणात पोहोचली नाही़
माथेफिरूकडून मंगल कार्यालयात जाळपोळीचा प्रयत्न
By admin | Updated: April 1, 2017 13:46 IST