शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिंतींवर संदेश, शहरात मात्र अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 22:02 IST

पाचोरा शहरातील स्थिती । सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था, घनकचरा व्यवस्थापनाची समस्या कायम

पाचोरा : शहरात ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ नगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात राबवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र पालिकेतर्फे उभारण्यात आलेले शौचालये, प्रसाधनगृहे यांची दुरवस्था झाली आहे. नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याने स्वच्छ सर्वेक्षण २०२० चा पुरता बोजवारा झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.शहरातील सार्वजनिक शौचालये, प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित यंत्रणा व ठेकेदाराकडून नियमितपणे साफसफाई केली जात नाही. नागरिकांनी उघड्यावर शौचस न जाता सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा यासाठी पालिकेतर्फे दहा ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात आली. मात्र यामध्ये नियमितपणे पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. साफसफाईच्या नावाखाली मात्र बिले काढली जात असून सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्यासाठी नागरिकांकडून संबंधित ठेकेदार दोन रुपयांची आकारणी करतात. याबाबत सत्ताधारी नगरसेवकदेखील प्रचंड नाराज असून त्यांना नागरिकांच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेचे नगरसेवक सतीश चेडे, राष्ट्रवादीचे अशोक मोरे यांनी संबंधित यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत योग्य खर्च करून शहर स्वच्छतेकडे त्वरित लक्ष द्यावे. शहरातील स्वच्छतागृहांची साफसफाई करावी, घनकचरा व्यवस्थापन नियमित करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.गटारीतील घाण पाणी रस्त्यावर येऊन ते सर्वत्र वाहते व काही ठिकाणी साचते. यासंदर्भात नगरपालिकेचे ठेकेदार व कर्मचारी यांच्याकडे अनेकदा तक्रार व मागणी केली. परंतु कोणतीही कार्यवाही झाली नाही. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शहरातील व भुयारी मागार्तील भिंतींवर चित्र रंगवून शासनाच्या लाखो रुपये अनुदानाची उधळपट्टी झाली आहे. स्वच्छतेबाबत संदेश देणारे डिजिटल बॅनर लावून स्वच्छ व सुंदर शहराचा अविर्भाव केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ज्या भिंती स्वच्छतेचा संदेश देत आहेत त्याच भिंतींच्या आड प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे.