शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी व वायरमनची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. मंगळवारी कंपनीत कामाला आलेल्या वायरमनची तर गुरूवारी घाणेकर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. मंगळवारी कंपनीत कामाला आलेल्या वायरमनची तर गुरूवारी घाणेकर चौकात काही कामानिमित्त आलेल्या व्यापाऱ्याची दुचाकी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी व शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी लांबविली

ममुराबाद येथील रहिवासी मनू तुकाराम बोरसे हे अजिंठा चौफुली परिसरातील एका कंपनीत वायरमन म्हणून कामाला आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजता ते दुचाकीने (एमएच १९ एझेड ९५९७) निघाले. ९ वाजता कंपनीत आल्यानंतर त्यांनी पार्किंगमध्ये दुचाकी उभी केली व कंपनीत निघून गेले. सायंकाळी ५ वाजता कंपनीच्या बाहेर आल्यानंतर त्यांना दुचाकी जागेवर दिसली नाही. बोरसे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

व्यापाऱ्याची दुचाकी तरूणाने नेली चोरून...

व्यापारी अझर खान हे फालक नगरात राहतात. गुरूवारी सकाळी ११.३० वाजता ते घाणेकर चौकात काही कामानिमित्त दुचाकीने (एमएच १९ एफ १५८६) आले होते. मात्र, त्यांची दुचाकी विनेश चंपालाल बंडोर (२७, रा.अंजनगाव, ता. सेंधवा, जि. बडवाणी) या तरूणाने चोरून नेली. याबाबत अझर खान यांनी शनिपेठ पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास अजय पाटील करत आहेत.