शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भाजपातील बेबनाव मिटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 16:33 IST

आपसातील वाद चव्हाट्यावर

ठळक मुद्देविश्लेषण

हिंतेंद्र काळुंखेजळगाव जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असून सत्ताधारी गटातील बेबनावामुळे पक्ष तसेच पदाधिकाऱ्यांवर नामुष्की ओढवण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांचा या कोणावरही कंट्रोल नसल्याचेच दिसून येते.काही महिन्यांपूर्वीच सर्वसाधारण सभेत स्वकीय सदस्यांनीच बंड पुकारल्याने जिल्हा नियोजनकडून प्राप्त १२० कोटींच्या मंजूर विषयाच्या इतिवृत्तीला विरोध होेऊन हा विषय बारगळला होता. सत्ताधारी गटाची व पक्षाचीही यामुळे नामुष्की झाल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पदाधिकारी आणि सर्व सत्ताधारी सदस्यांची बैठक घेवून समजोता घडवून आणला. आणि सदस्यांच्या मागणीनुसार समान निधी वाटपासाठीच्या ठरावाला मंजुरीसाठी ११ रोजी विशेष सभा घेतली गेली. हा प्रकार तेव्हा मिटविला गेला तरी नुकताच पुन्हा असाच प्रकार घडला. दरम्यान अशा प्रकारे पदाधिकारी आणि सदस्य यांच्यातील बेबनाव तसेच गटबाजीमुळे आतापर्यंत कामांचे नियोजनावर परिणाम होत आला आहे. एवढेच नाही तर पदाधिकारी आणि सदस्यांमधील अशा वादामुळे अधिकाऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. यामुळेच त्यांना फावले असून अधिकाऱ्यांवरही कोणाचा वचक राहिलेला नाही.नुकताच झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपातील बेबनाव पुढे आला. जिल्हा परिषद अध्यक्षांनी अतिरिक्त कामांना मंजुरीबाबत सिंचन विभागाला सूचना दिल्याच्या निर्णयास सत्ताधारीच काही सदस्यांनी या सभेत विरोध केला. एकीकडे भाजपा हा शिस्तप्रिय पक्ष आहे, असे म्हटले जात असताना जि. प. अध्यक्षांच्या निर्णयाला अधिकाºयांकडे पत्र देवून किंवा पक्ष नेत्यांपुढे अथावा जिल्हाध्यक्षांकडे हा विषय मांडून आपसात प्रश्न सोडवायला हवा होता. परंतु तसे कधीही न होता आपसातील वाद हे नेहमीच चव्हाट्यावर येवू लागले आहेत. कोणीच ऐकण्यास तयार नाही, असेच या घटनांमधून दिसत आहे. यामुळे पक्ष नेतृत्वाची हतबलताही समोर येते.