सावदा, ता.रावेर, जि.जळगाव : दुर्गा उत्सव व नवरात्रोत्सवानिमित्त सावदा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक ३० रोजी पोलीस ठाण्याच्या आवारात घेण्यात आली.उपविभागीय अधिकारी सुरेश वाघ अध्यक्षस्थानी होते. शांतता कमिटीचे सदस्य व दुर्गा उत्सवातील मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत सपोनि राहुल वाघ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नवरात्र उत्सवासाठी ६ व ७ आॅक्टोबर या दोनच दिवशी मिरवणुकीला बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. नंतरची परवानगी रात्री दहापर्यंत राहील. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशाचे जे कोणी उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मिरवणूक रात्री दहाला बंद झाली पाहिजे. सर्व मंडळांनी मिरवणूक लवकर काढा म्हणजे जास्त आनंद लुटता येईल. पोलीस प्रशासनाला अडचणीत आणू नका. दिलेली वेळ पाळा, पारंपरिक वाद्य लावा, डीजे लावल्यास कारवाई करण्यास भाग पाडू नका. सहकार्याची भावना ठेवा. उत्सव आनंदात साजरा करा. शांततेत पार पाडा. कारवाईची वेळ येऊ देऊ नका.बी.जे.लोखंडे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, उद्योगपती हाजी हारून शेठ, नाझीम भाई, श्रीकांत वाणी, नगरसेवक विश्वास चौधरी, सय्यद अजगर, अख्तर भाई, शेख गुलाम, गोटू खान, सय्यद खलील आदी उपस्थित होते
सावदा येथे शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:42 IST
दुर्गा उत्सव व नवरात्रोत्सवानिमित्त सावदा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली.
सावदा येथे शांतता समितीची बैठक
ठळक मुद्देनियमांचे पालन कराप्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडू नकादिलेली वेळ पाळा