शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीच्या सभेत विरोधी गटाच्या सदस्यांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 20:20 IST

साकळी येथील ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत विरोधी गटाच्या सदस्यांनी शुक्रवारी सभात्याग केला.

ठळक मुद्देपाणीपुरवठ्याच्या व्हॉल्व्हकडे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याचा आरोपसात-आठ महिन्यांपासून निवेदन देऊनही समस्या न सुटल्याने स्वीकारला पवित्रासभा संपेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

यावल, जि.जळगाव : तालुक्यातील साकळी येथील ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत विरोधी गटाच्या सदस्यांनी शुक्रवारी सभात्याग केला.साकळी येथील उर्दू शाळेसमोर असलेल्या पाणीपुरवठ्याच्या व्हॉल्व्हकडे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने शुक्रवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सभात्याग करत सभा संपेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन दिले.ग्रामस्थांसह प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्हाल्वची पूजा-अर्चा केली. गावातील सार्वजनिक समस्येसाठी अशा प्रकारे प्रथमच आणि अनोखे आंदोलन झाल्याने या आंदोलनाची गावात चर्चा होती.सात-आठ महिन्यांपासून निवेदन देऊनही समस्या न सुटल्याने ३० रोजी झालेल्या मासिक सभेत जगदीश मराठे, सैय्यद अशफाक, बेबाबाई चौधरी, नीलिमा नेवे यांनी सभात्याग केला.या वेळी जि.प.चे माजी सदस्य वसंतराव महाजन यांनी आपली संतप्त भूमिका मांडताना सांगितले की, अशा दूषित पाणीपुरवठ्यामुळे काही महिन्यांपूर्वी अतिसाराची लागण होऊन एक नऊ वर्षीय बालिका दगावली होती, असा दुर्लक्षित कारभार करून अजून किती लोकांचा जीव घेणार?दरम्यान, ग्रामविकास अधिकारी डी.आर. निकुंभ यांनी आंदोलन ठिकाणी येऊन समस्या जाणून घेतली व लवकरात लवकर सोडविणार असल्याचे उपस्थितांसमोर सांगितले.याप्रसंगी जीवन बडगुजर, सचिन चौधरी, संतोष महाजन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.व्हॉल्व्हची दुरूस्ती वेळोवेळी केलेली आहे. विरोधकांजवळ कोणताही मुद्दा नसल्याने विरोधक स्टंटबाजी करीत आहेत. प्रस्तावित राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावातील सर्व जीर्ण व्हॉल्व्ह बदलून नवीन व्हॉव्हल बसविण्यात येतील.-सुषमा पाटील, सरपंच, साकळी, ता.यावल

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतYawalयावल