शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात जिल्हाधिका-यांनी घेतलेली बैठक निष्फळ, तलाठी संपावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 13:17 IST

बोलणी फिस्कटली

ठळक मुद्देआरोपींना अटकेसाठी मागितली वेळराज्यभरात लेखणी बंदची लवकरच घोषणा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31 - अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी सुरू केलेल्या लेखणी बंद आंदोलनासंदर्भात मंगळवारी तलाठी संघाचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची बैठक झाली. यामध्ये आरोपींना अटक करण्याचे केवळ आश्वासन मिळाल्याने बोलणी फिस्कटून तलाठी बांधव बंदवर ठाम आहे. दरम्यान, आरोपींना लवकर अटक झाली नाही तर राज्यभर बंद पुकारण्याचा इशारा तलाठी संघाने दिला आहे.   अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना 17 जानेवारी रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मारहाण करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी 18 जानेवारीपासून  लेखणी बंद आंदोलन सुरू केले असून ते 13 दिवसांनंतरही सुरूच आहे. आता या आंदोलनात नाशिक विभागातील तलाठीदेखील सहभागी झाले असून 24 जानेवारीपासून संपूर्ण विभागात लेखणी बंद सुरू आहे.     या पाश्र्वभूमीवर मंगळवार, 30 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके,  पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची तलाठी संघासोबत बैठक झाली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने बैठक निष्फळ ठरली. आरोपींना अटक करण्याचे केवळ आश्वासन देण्यात आले, मात्र ठोस कारवाई नसल्याने तलाठी संघाचे पदाधिकारी आरोपींना तत्काळ अटकेच्या मागणीवर ठाम असून बंद सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी जिल्हा तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष एन.आर. ठाकूर, संघटक व्ही.आर. मानकुंभरे, सरचिटणीस जे.डी. बंगाळे, खजिनदार सचिन जगताप उपस्थित होते. 

राज्यभरात लेखणी बंदची लवकरच घोषणादोषींना अटक होत नसल्याने जिल्हा बंद नंतर विभागातही लेखणी बंद आंदोलन सुरू झाले आहे.  आजही ठोक कारवाई होत नसल्याने आता राज्यभरात लेखणी बंद करण्याची लवकरच तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे जे.डी. बंगाळे यांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात 29 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा तलाठी संघाच्या पदाधिका:यांनी विभागीय आयुक्त महेश झगडे यांचीदेखील भेट घेतली होती. प्रशासकीय कामेही रेंगाळलेतलाठींच्या लेखणी बंदमुळे प्रशासकीय कामेही रेंगाळली असल्याचे अधिका:यांमार्फतच सांगितले जात आहे. सातबारा संगणीकरणाचे काम 10 टक्क्याने खाली आले असून वसुलीही ठप्प झाली आहे. 

तलाठी लेखणी बंद संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात येऊन बंद मागे घेण्याची विनंती करण्यात आली. पोलीस अधीक्षकांसह माङयामार्फत कार्यकवाही सुरू आहे. - किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी.