शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील गाळेधारकांकडून नेत्यांच्या भेटी गाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 12:59 IST

गाळेप्रश्नी मदतीची मागणी : मुंबईत सुरेशदादा जैन यांची घेतली भेट; सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला

ठळक मुद्दे 18 व्यापारी संकुलातील गाळे ताब्यात घेण्याबाबत निर्णय सुरेशदादा जैन यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशीही चर्चा गाळेधारकांनी केलेल्या आग्रहावरून सुरेशदादांनी मुंबईहून महापौर नितीन लढ्ढा यांच्याशी संपर्क साधला

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30 - गाळेकरारप्रश्नी न्यालयालयाने दिलेल्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर गाळेधारक संघटनांकडून नेत्यांच्या भेटी गाठी घेण्यात येत आहेत. गाळेधारक संघटनांच्या प्रतिनिधींनी शनिवारी मुंबईत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेतली व मदत करण्याची मागणी केली. गाळेधारक हे तीन दिवसांपासून मुंबईत मुक्कामी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही गुरुवारी भेट घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. गाळेकरारप्रश्नी दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 18 व्यापारी संकुलातील गाळे ताब्यात घेण्याबाबत निर्णय दिला आहे. याबाबत व्यापारी व मनपा यात सुवर्णमध्य साधावा अशी अपेक्षा व्यक्त करत सेंट्रल फुले मार्केट व फुले मार्केट गाळेधारक संघटनेच्या प्रतिनिधींनी शनिवारी मुंबईत सुरेशदादा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. फुले मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष हिरानंद मंधवाणी, सेंट्रल  फुले मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मताणी, राजेश  वरयाणी, राजकुमार आडवाणी, प्रकाश समदडिया, प्रदीप जैन, राम भगवाणी, राजू साहित्या यांच्यासह अन्य गाळेधारकांचा या शिष्टमंडळात सहभाग होता. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्लागाळेधारकांनी घेतलेल्या भेटीप्रश्नी सुरेशदादा जैन यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशीही चर्चा केली. उच्च न्यायालयाचा निकाल असल्याने  त्यानुसार कारवाई होईल मात्र गाळेधारक सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात असे  गिरीश महाजन यांनीही यावेळी स्पष्ट केले. तर सुरेशदादांनी देखील गाळेधारक संघटनेच्या पदाधिका:यांना  सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. लढ्ढा यांच्याशीही साधला संवादगाळेधारकांनी केलेल्या आग्रहावरून सुरेशदादांनी मुंबईहून महापौर नितीन लढ्ढा यांच्याशी संपर्क साधला. लढ्ढा यांनी यावेळी न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली. गाळेधारकांनी आपली मुंबईत भेट घेतली. त्यांची भूमिका जाणून घेतली. त्यांच्याबाबत सहानुभूती असली तरी न्यायालयाचे निर्देश असल्याने गाळेधारकांना सर्वोच्च न्यालयालय हाच पर्याय  आहे.-सुरेशदादा जैन, माजी मंत्री