शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:18 IST

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिले निवेदन रावेर : राज्यातील १६ आदिवासीबहुल जिल्ह्यासह ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची धुरा अविरतपणे सांभाळणारे ...

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिले निवेदन

रावेर : राज्यातील १६ आदिवासीबहुल जिल्ह्यासह ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची धुरा अविरतपणे सांभाळणारे बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी गट 'ब' संवर्गाचे अधिकारी गेल्या १५ ते २० वर्षांपासून पदोन्नतीच्या हक्कापासून वंचित आहेत. म्हणून त्यांना तातडीने पदोन्नती द्यावी, अशी मागणी राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

शासनाने सेवेत पडलेले खंड क्षमापित करण्यासह सन २००० च्या शासन अधिसूचना व सामान्य प्रशासन विभागाच्या ९ सप्टें २०२१ च्या शासन निर्णयानुसार सेवा प्रवेश नियमात सुधारणा करून वैद्यकीय अधिकारी गट ब यांना वैद्यकीय अधिकारी गट अ संवर्गामध्ये पदोन्नती देतांना ३५ ते ५० टक्के आरक्षण देऊन शासनाने अन्याय दूर करावा, अशी मागणी राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघाने केली आहे.

मागील १५ ते २० वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी हे अविरतपणे ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेला आरोग्य सेवा देत आहेत. कोरोनाच्या काळात तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भरीव योगदान देत आपली उत्कृष्टसेवा बजावली. परंतु, एवढे वर्षांपर्यंत उत्तम सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या कुठल्याही संधी दिल्या गेल्या नाहीत. यात बहुतेक वैद्यकीय अधिकारी गट 'ब' यांच्याकडे वैद्यकीय अधिकारी गट 'अ' संवर्गाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला असून ते तो पदभार गेल्या अनेक वर्षांपासून सक्षमपणे सांभाळत आहेत.

ग्रामीण भागातील बहुतांश शासकीय आरोग्यसेवेचा भार हा वैद्यकीय अधिकारी गट 'ब' यांच्या खांद्यावर आहे. असे असूनसुद्धा त्यांना समान काम, समान वेतन व सन २००० च्या शासन अधिसूचनेनुसार त्यांची पदोन्नतीही शक्य असताना वेळकाढू धोरण अवलंबिले जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने संघटनेसोबत चर्चेसाठी वेळ देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणीही वैद्यकीय अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांच्या मार्गदर्शनात जळगाव शाखेकडून डॉ. शिवराय पाटील, डॉ अतुल लाडवंजारी, डॉ. तुषार मोरे, डॉ. शीतल चव्हाण या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

‘एक शिपाई ३०/३५ वर्षात शिपायाचा क्लर्क होतो, क्लर्कचा हेड क्लर्क व विस्तार अधिकारी होतो, विस्तार अधिकाऱ्याचा डेप्यूटी सीईओ होतो, किंवा तलाठीचा सर्कल अशी पदोन्नती होत असते. पण एक वैद्यकीय अधिकारी ३० ते ३५ वर्षे काम करूनही त्याच पदावर रिटायर होतो. वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीची एकही संधी उपलब्ध नाही याचे वाईट वाटते.

-डॉ. शिवराय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी रावेर.

जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देताना डॉ. शिवराय पाटील, डॉ. अतुल लाडवांजरी, डॉ. तुषार मोरे आदी. (छाया : किरण चौधरी)