शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात एमबीए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:42 IST

जळगाव : गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्चमध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता एमबीए अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया ८ ते २८ ...

जळगाव : गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्चमध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता एमबीए अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया ८ ते २८ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत असून, त्याबाबतचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर केले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर पूर्वी ज्या पद्धतीने महाविद्यालयात कागदपत्रे पडताळणीसाठी सुविधा केंद्र सुरू असायचे, तशी पद्धत यावर्षी न राबविता स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ई-स्कुटिनी सेंटर सुरू करण्यात आले आहे.

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्चने हे सेंटर सुरू केले आहे. त्याचा क्रमांक ५१०२ असून त्यावर विद्यार्थी आपले ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करू शकतील व त्याची ऑनलाईन नोंदणी व कागदपत्र पडताळणीही महाविद्यालयाच्या ईस्कुटिनी सेंटरद्वारे होणार आहे. या सेंटरमध्ये नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांची नावे अंतिम मेरिट लिस्टमध्ये येणार नाही व शिष्यवृत्तीसही अपात्र ठरू शकतील.

असे आहे वेळपत्रक: ८ ते १३ डिसेंबरदरम्यान ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविली जाणार असून १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पडताळणी केली जाणार आहे. १६ डिसेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. १७ व १८ डिसेंबर रोजी सूचना, बदल अथवा तक्रार नोंदविता येणार असून, २० डिसेंबर रोजी अंतिम मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे. पहिला कॅप राऊंड २१ ते २३ डिसेंबर व दुसरा कॅप राऊंड ३१ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी व प्रवेशासंबंधीच्या विविध अडचणींसाठी प्रा. चंद्रकांत डोंगरे (७५०७७०००७५) आणि प्रा. चेतन सरोदे (९८६०६००१६५) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.