शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बाळाला वा:यावर सोडून मातेचे पलायन

By admin | Updated: June 1, 2016 00:59 IST

सात दिवसाच्या बालकाला सोडून मातेने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजता जिल्हा रुग्णालयातील प्रसूती व बालरोग विभागाजवळ घडला.

जळगाव : पाणी पिऊन येते, असे सांगून सात दिवसाच्या बालकाला सोडून मातेने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजता जिल्हा रुग्णालयातील प्रसूती व बालरोग विभागाजवळ घडला. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयात प्रचंड खळबळ उडाली आहे. अतिशय गोंडस अशा बाळाला सोडून पळ काढलेल्या या मातेविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ही निर्दयी माता रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. पाणी पिऊन येते, बाळाकडे लक्ष ठेवा.. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती कक्षाजवळील बाहेरील मोकळ्या जागेत मंगळवारी सकाळी साडे सात वाजता एक महिला बालकाला घेऊन येते. तेथे उपस्थित असलेल्या सहा ते सात महिलांच्या शेजारी बसते. बालकाला दूध पाजल्यानंतर पाणी पिऊन येते; बाळाकडे लक्ष ठेवा, असे शेजारच्या महिलेला सांगून पावणे आठ वाजेच्या सुमारास बाहेर गेलेली ही महिला परत आलीच नाही. पोलिसांना चौकशीत असहकार्य बरीच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर ही महिला परत न आल्याने एका महिलेने हा प्रकार तेथे असलेल्या मंगला पवार व रियान शेख या महिला सुरक्षा रक्षकांना सांगितला, त्यांनी परिचारिका लता किसन देशमुख व विमल संजय चौधरी यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांना घटनेविषयी कळविण्यात आले. उपनिरीक्षक मनोज ठाकरे, सहायक फौजदार सुभाष पवार व कॉन्स्टेबल प्रवीण भोसले यांनी घटनास्थळ गाठून परिसरात चौकशी केली. मात्र, सकाळी तेथे उपस्थित असलेली एकही महिला माहिती देण्यासाठी पुढे आली नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासले जिल्हा रुग्णालयात इतरत्र प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आर.के. शेळके यांच्या दालनात रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात सकाळी 7.40 ते 7.48 या 8 मिनिटांच्या वेळेतच महिलेने बाळाला सोडून पलायन केल्याचे स्पष्ट दिसत  आहे.