शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

बीएचआर घोटाळ्यातील मास्टर माईंड अखेर जाळ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:19 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था अर्थात बीएचआर या संस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील मास्टर माईंड सुनील देवकीनंदन ...

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था अर्थात बीएचआर या संस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील मास्टर माईंड सुनील देवकीनंदन झंवर (रा.जय नगर, जळगाव) हा तब्बल ९ महिन्यानंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सकाळी १० वाजता नाशिकमधून त्याच्या मुसक्या आवळल्या. पंचवटी पोलीस ठाण्यात अटकेची नोंद करुन त्याला पुण्यात आणण्यात आल्याची माहिती उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी ‘लोकमत’ ला दिली.

पुण्याच्या डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त शिक्षिका तथा ठेवीदार रंजना खंडेराव घोरपडे (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत फसवणुकीचा आकडा १७ लाख ८ हजार ७४२ इतका होता तर आतापर्यंत तपासात ही रक्कम ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार व अवसायक जितेंद्र कंडारे यालाही सात महिन्यानंतर २९ जून रोजी इंदूर येथून अटक करण्यात आली आहे. कंडारे सध्या कारागृहात आहे. झंवर व कंडारे या दोघांना न्यायालयाने फरार घोषीत करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. जिल्हा व उच्च न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन वेळोवेळी फेटाळून लावला होता. झंवर हा वेशांतर करुन जळगाव, मुंबई, राजस्थान व इंदूर येथे वावरत होता. ९ महिने पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. सोमवारी रात्रीपासून पुणे पोलिसांनी सापळा लावला होता. दरम्यान, या गुन्ह्यात आता योगेश किशोर साखला व माहेश्वरी (रा.जळगाव) हे दोन जण पोलिसांना हवे आहेत. झंवर याला बुधवारी पुणे न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती तपासाधिकारी पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांनी दिली.

अशी केली झंवरची खात्री

झंवर नाशिक येथे नातेवाईकाच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी एक पथक नाशिकला रवाना केले. सोमवारपासून पथकाने त्याच्या राहण्याचा ठावठिकाणी काढून घराच्या बाहेर सापळा रचला. मंगळवारी सकाळी १० वाजता तो गॅलरीत आला असता पथकाने त्याचा लांबूनच मोबाईलमध्ये फोटो घेतला. या फोटोतील व्यक्ती सुनील झंवरच आहे का? म्हणून नवटके व त्याला ओळखणाऱ्या पोलिसांना पाठविण्यात आला. खात्री पटताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. लाल रंगाचे शर्ट, चष्मा व कपाळाला लाल टिळा त्याने लावला होता.