शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘मेस्ट्रो स्पर्धेत प्रताप व आयएमआर महाविद्यालयाची सरशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 21:25 IST

मू.जे.महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतर्फे बुधवारी आयोजित ‘मेस्ट्रो’ या राष्ट्रीय स्पर्धेत अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाने तीन तर केसीई सोसायटीच्या आय.एम.आर. महाविद्यालयाने पाच पारितोषिके पटकावित आपले वर्चस्व सिध्द केले. 

ठळक मुद्देजीएसटी, शेअर बाजार, मार्केटींग विषयांवर विद्यार्थ्यांचे सादरीकरण स्टॉक मार्केट गेमव्दारे १ करोड रुपयांची खरेदी पीपीटी स्पर्धेत ४३ संघाचा समावेश

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.२०-मू.जे.महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतर्फे बुधवारी आयोजित ‘मेस्ट्रो’ या राष्ट्रीय स्पर्धेत अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाने तीन तर केसीई सोसायटीच्या आय.एम.आर. महाविद्यालयाने पाच पारितोषिके पटकावित आपले वर्चस्व सिध्द केले. 

या स्पर्धेत ३७ संघातील ९२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. जळ्गाव, धुळे, पुणे, नांदेड, औरंगाबाद येथील संघांचा सहभाग होता. स्पर्धेेचे उदघाटन के.सी.ई.संस्थेचे सचिव अ‍ॅड. एस.एस.फालक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्राचार्य उदय कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. ए.पी.सरोदे, समन्वयक कल्पना नंदनवार, स्पर्धा संयोजन सचिव सुरेखा पालवे उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण चार स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये आॅनलाईन स्टॉक मार्केट गेम, जाहिरात विकास, प्रश्नमंजुषा, पॉवर पॉइंट सादरीकरण या प्रकारांचा समावेश होता.

स्टॉक मार्केट स्पर्धेत खरेदीसाठी चुरसस्पर्धेत आॅनलाईन स्टॉक मार्केट गेम स्पर्धेत ४१ संघातील ६३ जणांनी सहभाग घेतला होता. ४ तासात विद्यार्थ्यांनी कौशल्य पणाला लावीत १ करोड रुपयांपर्यतचे वेबसाईटवर शेअर खरेदी विक्री करीत स्पर्धेत रंगत आणली. जाहिरात विकास या स्पर्धेत मॅड शो, प्रो सेलो अशा  राउंडमध्ये १४ संघातील ५६ जणांनी सहभाग नोंदविला. जाहिरात करणे, ती ओळखणे व जाहिरातीचे उत्पादन विक्री करणे असे प्रकार स्पर्धक विद्यार्थ्यांनी करून दाखविले. परीक्षण आयएमआर महाविद्यालयाचे डॉ.अनुपमा चौधरी, एसएसव्हीपीएस महाविद्यालय, धुळेचे प्रा.भाग्यश्री पाटील यांनी केले.

पीपीटी स्पर्धेत ४३ संघाचा समावेशपीपीटी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जीएसटी, मार्केटींग अशा विविध विषयांचे प्रभावी सादरीकरण करीत परीक्षकांना जिंकून घेतले. ४३ संघातील ६६ जणांनी स्पर्धेत सहभाग घेतला. परीक्षण आयएमआर महाविद्यालयाचे प्रा.बी.जे.लाठी आणि प्रा. तनुजा फेगडे यांनी केले.तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत सामान्य ज्ञान, मनुष्यबळ व्यवस्थापन, मार्केटिंग, संगणकशास्त्र, अकौन्टिंग विषयी विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे उत्तरे दिली. समारोप ्रप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून आयएमआर महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शिल्पा बेंडाळे या उपस्थित होत्या. 

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहिरात विकास प्रथम - स्नेहल बोदडे, वैभव मोरे, गिरीश मोरे, परेश भदाणे (प्रताप महाविद्यालय, अमळनेर)द्वितीय  - शुभांगी पाटील, सायली पाटील, मनीषा पाटील, कृष्णा महाजन (म.गांधी महाविद्यालय, चोपडा)तृतीय  -ऐश्वर्या खंबायत, काजल चोपडे, गणेश जैन, सनी जैन (आयएमआर)उत्तेजनार्थ - धनश्री पाटील, तेजस्विनी पाटील, मयूर पाटील, तरूण पंजवानी (प्रताप महाविद्यालय, अमळनेर)

पीपीटी स्पर्धा प्रथम - अमृता नवाल (आयएमआर)द्वितीय  - साधना प्रजापत (मू.जे.महाविद्यालय)तृतीय - श्रद्धा चावला, आकृती सावनी (जी.एच.रायसोनी महाविद्यालय)उत्तेजनार्थ - एच.डी.गांधी, प्रसाद मधुसूदन (प्रताप महाविद्यालय, अमळनेर)

आॅनलाईन स्टॉक  मार्केट गेम स्पर्धा प्रथम - प्रीतेश कांकरिया, संजय प्रजापत (रायसोनी महाविद्यालय)द्वितीय - हर्षल संचेती, अभिजित शर्मा  (आयएमआर)तृतीय- आकाश आबाद, शुभम नेवे ( आयएमआर)उत्तेजनार्थ - १) धनंजय सपकाळे (आयएमआर),२) अहमद रजा, तेजस पाटील (म.गांधी महाविद्यालय, चोपडा),३) परमेश्वर नाईक (गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी)

प्रश्नमंजुषा स्पर्धाप्रथम -सायली देसाई,अक्षय संचेती, गौरी बबन (नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव)व्दितीय - दिपक पाटील, अमोल पाटील, उमेश खडसे (नूतन मराठा महाविद्यालय)तृतीय - गौरव बारी, दिपाली बिलखेडे, कोमल ताडे (गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी)