शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:14 IST

आनंद सुरवाडे वाढत्या तक्रारी : रोज स्वच्छ मास्क वापरा, वारंवार घाम पुसण्याचा तज्ज्ञांचा सल्ला लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

आनंद सुरवाडे

वाढत्या तक्रारी : रोज स्वच्छ मास्क वापरा, वारंवार घाम पुसण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना काळात संरक्षण म्हणून नाका - तोंडावर मास्क लावणे अत्यावश्यक असून ते आता सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, या मास्कच्या वापरामुळे चेहऱ्याला घाम येणे, खाज सुटणे असे ॲलर्जीचे प्रकारही वाढत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून समोर यायला लागल्या आहेत. यासाठी नियमित स्वच्छ धुतलेलाच मास्क वापरावा व काही अवधी तो मास्क काढून चेहरा स्वच्छ करावा, असा सल्ला त्वचा रोग तज्ज्ञांनी दिला आहे.

गेल्या दीड वर्षांपासून सर्वच नागरिक कोरोनाचा सामान करीत आहेत. या काळात संरक्षण म्हणून मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनापासून संरक्षण हवे असल्यास नाका तोंडावर अगदी व्यवस्थित मास्क परिधान करावे, असे डॉक्टर सांगतात.

मास्क आवश्यकच...पण असे करा त्वचेचे रक्षण

मास्क वापर करणाऱ्याच्या त्वचेवरही ॲलर्जीचे स्वरूप ठरलेले असते. तेलगट त्वचा असणाऱ्यांना याचा त्रास अधिक होऊ शकतो. घामामुळे फंगल इंफेक्शन होऊ शकते, त्या ठिकाणी खास येणे, पुरळ उठणे असा त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत कॉटनचा मास्क वापरणे चांगले. तो नेहमी स्वच्छ करून वापरावा, वारंवार मास्कला हात लावू नये, दिवसातून बराच वेळ आपल्याला मास्क वापरावा लागत असेल तर काही वेळ काढून घाम स्वच्छ पुसून घ्यावा, महिलांनी अति मेकअप करून त्यावर मास्क घालू नये यामुळे ॲलर्जी अधिक होऊ शकते, असे त्वचाविकार तज्ज्ञांनी सांगितले आहे.

कोट

स्वच्छ मास्कच वापरा

मास्कमुळे होणारी ॲलर्जी ही तीन प्रकारांवर अवलंबून असते, एक म्हणजे वापरणाऱ्याची त्वचा, मास्क कोणत्या प्रकारचा वापरला जातोय ती आणि तिसरी म्हणजे मास्कचा आपण किती वेळ वापरतो. अशा स्थितीत पुरळ येणे, खाज सुटणे, जागा काळी पडणे असे त्रास उद्भवू शकतात. अशा स्थितीत आरोग्य कर्मचारी नसाल तर कॉटनचा मास्क वापरावा तो स्वच्छ धुऊनच वापरावा, काही काळ तो काढून चेहरा स्वच्छ करावा. - डॉ. स्नेहल लोळगे, वरिष्ठ निवासी, त्वचारोग विभाग जीएमसी

सॅनिटायझरपेक्षा साबण बरे

- वारंवार सॅनिटायझरचाही वापर केल्याने हाताला त्रास होऊ शकतो, अशा वेळी लवकर उपलब्ध होत असेल तर साबणानचे हात स्वच्छ धुवावे.

- सॅनिटायझरमध्येही ७० टक्के अल्कोहोल असल्यावरच ते विषाणूला मारू शकते.

- साबण नसेल आणि हात स्वच्छ करायचे असतील तर मात्र, सॅनिटायझर वापरावे ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी शक्यतोवर वापरू नये, मात्र, तोपर्यंत नाका-तोंडाला हात लावू नये.