शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

शिक्षकासोबत पळून विद्यार्थिनीने केला विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:02 IST

जामनेर : आंधळ्या प्रेमामुळे मुलीचे कुटुंबीय हतबल

ठळक मुद्देमहाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अशा आंधळ्या प्रेमाच्या घटना ऐकावयास मिळतात, मात्र ज्यांच्यावर विश्वास ठेवून पालक आपल्या मुलींना शिक्षणासाठी पाठवितात त्या शिक्षकानेच असे करावे हे सूज्ञास अपेक्षित नाही.यात दोष केवळ त्या शिक्षकालाच देता येणार नाही, तर आपली मुलगी कुणाबरोबर किती वेळ बाहेर असते, मोबाईलवर कुणाशी संपर्कात असते यावर लक्ष देण्याची पालकांची जबाबदारी आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

जामनेर, जि.जळगाव : प्रेम आंधळे असते हे अनेकदा सिद्ध झाले असून, अशीच घटना जामनेर शहरात घडली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी शिक्षकाच्या प्रेमात पडली व त्या शिक्षकासोबत पळून जावून तिने विवाह केला. लग्न करून दोघे थेट पोलीस ठाण्यात पोहचले. या ठिकाणी त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी समजाविले. मुलीला तिच्या आईने विनंती केली, पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर मुलगी व मुलगा दोघेही सज्ञान असल्याने पोलीस व कुुटुंबीयदेखील हतबल झाले.ही प्रेम कहाणी ‘ती’ मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सुरू झाली. यातील प्रियकर हा त्या महाविद्यालयात तात्पुरत्या नियुक्तीवर प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. येथून या प्रेमकहाणीला बहर आला.हा शिक्षक त्याच्या अशा कारवायांमुळे नोकरीतून बाहेर पडला. मध्यंतरी तो पुण्यास होता, तर त्यानंतर तो जळगावला स्थायिक झाला.या प्रेमकहाणीतील ‘ती’ जामनेरला असली तरी तिचे व त्याचे मोबाईल, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क कायम होते.अखेर ती मंगळवारी कुुटुंबीयांना काहीही न सांगता अचानक बेपत्ता झाली. जवळपास शोध घेऊन ‘ती’ न सापडल्याने पालकांनी पोलीस स्टेशन गाठले.मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ते दोघे पोलिसांसमोर हजर झाले. तिचे कुटुंबीय, शहरातील नातेवाईक, समाजबांधव गोळा झाले. तिला समजाविले. आई तर तिला समजाविताना ढसाढसा रडत होती, पण आंधळ्या प्रेमापुढे ती हतबल ठरली.अखेर तिने त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय पक्का केल्याने कुटुंबीयांनी हात टेकले. दरम्यान, कायदेशीर बाबींची पूर्तता करून ती त्याच्यासोबत निघून गेली. 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJamnerजामनेर