शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
2
काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा
3
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
4
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
5
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
6
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
7
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?
8
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
9
पावसाचं आगमन अन् भारतीय कर्णधाराची तारांबळ; रोहित-द्रविडचा मजेशीर VIDEO
10
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती
11
इंग्लंडमध्ये तरूणीने पाकिस्तानच्या शादाबची लाज काढली; एका वाक्यातच बोलती बंद
12
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
13
4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!
14
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
15
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
16
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
17
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
18
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
19
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
20
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

पाचोरा येथे विवाहितेवर सामुहीक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 2:33 PM

दोघा आरोपींना अटक

पाचोरा : विवाहितेला भर रस्त्यावर एकटीला गाठून रिक्षात ओढून तारखेडा खु रस्त्याच्या बाजूला शेतात नेण्यात आले व या ठिकाणी या विवाहितेवर दोघांनी आळीपाळीने पाशवी बलात्कार केल्याची घटना पाचोरा घडलीे. ही घटना १९ रोजी सायंकाळी घडली असून या प्रकारणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, येथील एका दवाखान्यात सफाईचे करणारी विवाहिता ही १९ रोजी संध्याकाळी ६.३० चे सुमारास दवाखान्यातुन काम आटोपून घराकडे निघाली असता जारगाव चौफुलीच्या अलीकडे पिंटू उर्फ गोविंद दत्तू पुजारी (वय ३६) रा. हनुमान नगर पाचोरा व त्याचा साथीदार रिक्षाचालक नुरा फतू पटेल (वय ५०) रा. शिवाजीनगर पाचोरा हे रिक्षा घेऊन तेथे आले.विवाहितेला पाहताच तिला रिक्षात बसण्याचा आग्रह पिंटू याने केला. सदर महिलेला त्याचे हावभाव लक्षात येताच तिने नकार दिला.पिंटू उर्फ गोविंद हा महिलेच्या शेजारीच रहात असून त्याने नकार दिल्यावर तिचा हात धरून रिक्षात ओढले. महिलेच्या तोंडावर रुमाल टाकून तोंड दाबून तिचा आवाज बंद केला व रेल्वे पुलाकडील तारखेडा रोड लगतच्या शेतात ते रिक्षा घेऊन गेले. या ठिकाणी पिंटू उर्फ गोविंद पुजारी व नुरा पटेल या दोघांनी आळी पाळीने तिच्यावर बलात्कार केला. याचबरोबर वाच्यता केल्यास खुनाची धमकी दिली तसेच या महिलेला रात्री ८.३० चे सुमारास परत जारगाव चौफुली वर सोडून आरोपी निघून गेले.यावेळी हनुमान जयंती निमित्त गल्लीत कीर्तन सुरू असल्याने कीर्तन संपल्यावर झाला प्रकार पीडित महिलेने शेजारच्या नातेवाईकाला सांगितला.याप्रकरणी पाचोरा पोलिसात भादवी ३७६ ड,३६३, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून तपास पीएसआय दत्तात्रय नलावडे करीत आहे. दरम्यान दोघे आरोपी विवाहित असल्याचे सांगण्यात आले.आरोपीस नागरिकांकडून मारहाणयाबाबत रात्री ११ चे सुमारास महिलेने आरोपीचे नाव सांगत घडलीली घटना कथन केली असता हनुमान नगर भागातील रहिवाशांनी पिंटूला घरातून ओढत पोलिस स्टेशनपर्यंत मारहाण करीत धिंड काढली. पोलिसांनी पिंटूला ताब्यात घेताच दुसऱ्या आरोपीचेही नाव सांगितले. दोघांना पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून अटक केली. दरम्यान पीडित महिलेचा पती, सासरा, सासू हे नंनदकडे येवला येथे २ दिवसापासून गेले होते .पीडित महिला व तिची आजे सासू घरी होते. आरोपी हा पीडितेच्या घरासमोर रहात असल्याने महिलेच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन हा प्रकार केल्याचे सांगितले.

टॅग्स :Rapeबलात्कार