आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१० : पती-पत्नीत सातत्याने होणा-या वादाला कंटाळून कंचन शामलाल वालेचा (वय ४० रा.जय समाधी अपार्टमेंट, सिंधी कॉलनी, जळगाव) या विवाहितेने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजता घडली. शिवाजी नगर रेल्वे पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, कंचन व पती शामलाल या दोघांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून वाद होत होते. समाजातील लोकांनी मध्यस्थी करुन त्यांचा वाद मिटविलाही होता. तर एक वेळा पोलिसातही प्रकरण गेले होते. मात्र तरीही दोघांमधील वाद कमी झाला नाही. शनिवारीही दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात आले. या वादाला कंटाळून कंचन यांनी आत्महत्या केली.बुट व चहा विक्रीचा व्यवसायकंचन यांचे पती शामलाल यांचा बळीराम पेठेत चहा विक्री व बुट विक्रीचा व्यवसाय आहे. मुलगा मुंबई येथे शिक्षण घेत आहे तर मुलगी त्यांच्यासोबतच राहते. कंचन या गृहीणी होत्या. बाबा नगरात त्यांचे माहेर आहे. दरम्यान, दुपारी शवविच्छेदन झाले.
जळगावात विवाहितेची धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 15:42 IST
पती-पत्नीत सातत्याने होणा-या वादाला कंटाळून कंचन शामलाल वालेचा (वय ४० रा.जय समाधी अपार्टमेंट, सिंधी कॉलनी, जळगाव) या विवाहितेने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजता घडली. शिवाजी नगर रेल्वे पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगावात विवाहितेची धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देकौटुंबिक वादातून केली आत्महत्या शिवाजी नगर रेल्वे पुलाखाली आढळला मृतदेहरात्री एक वाजता सोडले घर