शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रभावळ’ ने गाठली अनेक राज्यांची बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 11:51 IST

छंदातून झाली उदरनिर्वाहाची सोय

ठळक मुद्देखडके बंधूच्या कारागिरीतून साकारताहेत मखर आणि बरेच काही

चुडामण बोरसे ।जळगाव : छंदातून अनेक गोष्टी घडत असतात. जुन्या जळगावातील विठ्ठल पेठेतील रहिवासी असलेल्या खडके कुटुंबाला एक आगळा- वेगळा छंद लागला आहे. हाच छंद जणू त्यांचा पोट भरण्याचे साधन बनला आहे. या खडके बंधूनी देवाच्या मूर्तीसाठी बनविलेल्या प्रभावळ आणि मखर आता देशाच्या अनेक भागात जाऊ लागल्या आहेत. भरीताप्रमाणेच जळगावच्या ‘प्रभावळ’ म्हणून त्यांची आता वेगळी ओळख तयार झाली आहे.साध्या पत्र्यावर नक्षीकाम करुन त्यावर रसायन ओतून बफींग केले जाते. त्याला सोन्यासारखा लूक दिला जातो. यातून आकर्षक अशा प्रभावळ आणि मखर तयार केले जाते.विठ्ठल पेठेत राहणारे बंडू सोमा खडके यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले. स्वत:चे काही तरी वेगळे स्थान निर्माण करावे, अशी मनात जिद्द होती. या जिद्दीतून सन २००६ मध्ये त्यांनी देवपूजेसाठी अथवा धार्मिक स्थळी विकण्यासाठी काही छोटे तांबे बनविले. विक्रीसाठी ते स्वत: घेऊन जाऊ लागले. एकदा तांबे विकण्यासाठी ते शिर्डीला गेले होते. साईबाबांचे सिंहासन पाहून त्यांना आपण असे काही बनवू शकतो, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. घरी आल्यावर दिव्यांग असलेले मोठे बंधू राजेश सोमा खडके यांनीही साथ देण्यास होकार दिला. हळू -हळू एक- दोन नाही तर चक्क अनेक सिंहासन बनविण्यासाठी जणू त्यांच्याकडे रांग लागली. ही सिंहासेनही मग आंध्र आणि तामिळनाडूत जाऊ लागली. यामुळे पोटापाण्याचाही प्रश्न काही अंशी सुटला.जळगावच्या गुरुदत्त नगरातील साईबाबा मंदिर आणि ममुराबाद रोडवरील रेणुकामाता मंदिरात लावण्यात आलेली प्रभावळ खडके बंधूनी तयार केली आहे. याशिवाय शिरपूर येथील रिद्दी- सिद्धी गणपती मंदिरातही अशी छानशी प्रभावळ लावण्यात आली असल्याची माहिती खडके यांंनी दिली.देवाच्या प्रभावळ आणि मखरमधून पैसा कमी मिळतो. पण यात आम्हाला देवाचे सान्निध्य मिळत असते. कलेची आवडही जोपासली जाते आणि पोटासाठी थोडेफार मिळत असते.. यातच आम्हा भावंडांना समाधान आहे. साईबाबांच्या कृपेनेच हे सर्व घडत आहे.-बंडू खडके, प्रभावळ तयारकरणारे कारागीर.