शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची आत्महत्या, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

ब्राह्मण शेवगे येथील सविता हिने घराशेजारी राहणाऱ्या रवींद्र मच्छींद्र चव्हाण यांच्याशी तीन वर्षांपूर्वी आळंदी येथे विवाह केला होता. त्यानंतर ...

ब्राह्मण शेवगे येथील सविता हिने घराशेजारी राहणाऱ्या रवींद्र मच्छींद्र चव्हाण यांच्याशी तीन वर्षांपूर्वी आळंदी येथे विवाह केला होता. त्यानंतर पंधरा दिवसांनी हे दाम्पत्य मेहुणबारे पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यावेळी दोघांनी पोलीसांना आम्ही स्वखुशीने लग्न केल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी या दोघांचे रीतसर घरासमोर लग्न लावून दिले. लग्नानंतर दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. लग्नानंतर एक-दोन महिने सविता हिस तिच्या सासरच्यांनी चांगले वागविले. नंतर मात्र सविता हिस मुलगा झाल्यानंतरही सासूकडून हुंडा कमी दिला, असे सांगत काही ना काही कारणांवरून टोमणे मारत व मानसिक छळ करत तसेच दोघांना सासूने वेगळे काढून दिले.

घर बांधण्यासाठी माहेरून २ लाख रुपये घेऊन ये. तसेच तुझ्या आईवडिलांना तुझ्या नवऱ्याच्या नावावर दोन एकर जमीन करायला सांगत सासू, जेठ व जेठाणी यांनी सविता हिचा शिवीगाळ करीत शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून सविता हिने रविवार ३१ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र या आत्महत्येला मयत सविता हिची सासू, जेठ व जेठाणी हे जबाबदार असल्याची फिर्यादी आशाबाई मोरे यांनी दिल्यावरून सासू तुळसाबाई मच्छींद्र चव्हाण,जेठ समाधान मच्छींद्र चव्हाण व जेठाणी दिया समाधान चव्हाण यांच्या विरोधात भादंवि कलम ३०६, ४९८अ, ६०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.