शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मारेक:यांचे नाव सांगणा:याला बक्षीस

By admin | Updated: March 23, 2017 00:20 IST

भादली हत्याकांड : गायब सौदा पावती ङोरॉक्स सापडली एका दुकानात

जळगाव : तालुक्यातील भादली बु. येथील हत्याकांड प्रकरणात मारेक:याचे नाव सांगणा:यास पोलीस प्रशासनाने 25 हजारांचे बक्षीस           जाहीर केले आहे. बुधवारी ग्रामपंचायतीमार्फत याबाबत गावात दवंडी देण्यात आली. मारेक:याचे नाव सांगणा:याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. दरम्यान, शेत जमिनीच्या व्यवहाराची गायब झालेली सौदा पावतीही बुधवारी एका दुकानात सापडली. ही पावती येथे कशी याची विचारणा पोलिसांनी संबंधित दुकानदाराला केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याही चौकशी सुरु केली. मारेकरी गावातीलच असून  शेत जमिनीच्या कारणावरुनच हे हत्याकांड झाले असल्याचे तपासात पुढे आले आहे. बुधवारी 25 जणांची चौकशी करण्यात आली. त्यातील दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याआधी ताब्यात घेतलेल्या दोन्ही  संशयितांची कसून चौकशी सुरू असून त्यांच्या बोलण्यात वारंवार तफावत आढळून येत आहे.तीन दिवसात आतार्पयत पोलिसांनी 50 जणांच्यावर कसून चौकशी केली आहे, त्यातून दोन जणांर्पयत पोहचण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, मारेक:यांना एका वृध्द महिलेसह आणखी काही जणांनी पाहिले असल्याचा संशय असून मारेक:यांनी त्यांनाही ठार मारण्याची धमकी दिली असावी म्हणूनच नाव सांगण्यासाठी कोणी पुढे येत नाही, त्यामुळे पोलिसांनी आता बक्षीस जाहीर करुन नाव गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.महानिरीक्षकांचाही मुक्कामविशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी मंगळवारी संध्याकाळी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर नशिराबाद पोलीस स्टेशनला थांबून त्यांनीही काही संशयितांची चौकशी केली. रात्रभर मुक्काम करुन चौबे बुधवारी एक वाजता नाशिकला रवाना झाले. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, भुसावळचे सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल, एलसीबीचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल, तिस:या दिवशीही नशिराबादमध्ये ठाण मांडून होते.महसूलचे रेकॉर्ड तपासलेया गुन्ह्यात पुरावे गोळा करण्याच्या दृष्टिकोणातून बुधवारी महसूल विभागातील तलाठी व अन्य जणांनाही पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले होते. संशयित व्यक्तींच्या शेतीचे संपूर्ण जुने व नवीन रेकॉर्ड यावेळी तपासण्यात आले. त्यातून काही धागेदोरे मिळविण्याचा प्रय} पोलिसांनी केला.या गुन्ह्याच्या तपासासाठी पाच पथके रात्रंदिवस काम करीत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार पुरावे गोळा केले जात आहेत. मारेक:यांचे नाव सांगणा:याला 25 हजारांचे बक्षीस जाहीर केले असून त्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. नशिराबादचे प्रभारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी व माझा वैयक्तिक क्रमांकावर जाहीर केला आहे. बुधवारी 25 जणांची चौकशी केली.-डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षकगावक:यांची चुप्पी; तपासात अडथळेदोन चिमुरडय़ांस एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या झाल्यानंतरही गावक:यांनी या विषयावर चुप्पी साधली आहे. त्यामुळे पोलिसांना दवंडी देऊन बक्षीस जाहीर करावे लागले. गावक:यांची ही चुप्पी पोलीस प्रशासनासाठी तापदायक ठरत आहेत. दरम्यान, माहितीसाठी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल व सहायक निरीक्षक राहुल वाघ यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत.