शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

मराठा क्रांती मोर्चामुळे महामार्ग ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2017 23:55 IST

दीडशे जणांना अटक व सुटका : सुमारे 12 किमीर्पयत लागल्या वाहनांच्या रांगा

जळगाव: मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी आकाशवाणी चौकात 11 ते 11.30 या वेळेत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. चौकात रिंगण करुन खाली बसून आंदोलनकत्र्याकडून घोषणा दिल्या जात होत्या. अतिशय शिस्तीत व शांततेत झालेल्या आंदोलनामुळे कालंका माता चौक ते बांभोरीर्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अध्र्या तासानंतर दीडशे आंदोलनकत्र्याना पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर सोडून देण्यात आले.सकल मराठा समाजाच्यावतीने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मूकमोर्चाद्वारे आंदोलन करण्यात आले. संयमी व शांततेत आंदोलन झाल्यानंतरही त्याची दखल शासनाने घेतली नाही, म्हणून समाजाच्या हक्काच्या मागण्यांसाठी मंगळवारी पुन्हा चक्का जाम आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर हे आंदोलन झाले. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.घोषणांनी दणाणला चौकमोर्चकरी ठरलेल्या वेळी बरोबर 11 वाजता हातात भगवे ङोंडे घेवून आकाशवाणी चौकात घोषणाबाजी करत आले. ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही‘, ‘जय भवानी, जय शिवाजी’ व ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांनी चौक दणाणून गेला होता. चौकात रिंगण करुन आंदोलनकत्र्यानी ठिय्या मांडला होता. तर काही जण हातात भगवा ङोंडा घेवून बुलेटवरुन राउंड मारत होते.चारही बाजूंना वाहतुकीची कोंडीचौकात सुरु असलेल्या या आंदोलनामुळे धुळे-नागपूर महामार्ग तसेच महाबळकडून शहरात व शहराकडून महाबळकडे जाणारा मार्ग अर्धा तास बंद झाल्याने चारही बाजुंनी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. कोणत्याही चौकातून वाहतूक वळवली तरी पुढे महामार्गावर अडथळे येत होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या कर्मचा:यांची चांगलीच दमछाक झाली.रुग्ण वाहिकेसाठी केली वाट मोकळी रुग्ण घेवून आलेल्या रुग्णवाहिकेला आंदोलनकर्ते व पोलिसांनी तत्काळ वाट मोकळी करुन दिली. पोलिसांनी दिलेल्या सूचना व स्वत:च्या आचारसंहितेचे आंदोलनकत्र्यानी पालन केले. त्यामुळे वादाचे प्रसंग टळले.यांनी घेतला आंदोलनात सहभागप्रा.डी.डी.बच्छाव, डॉ.राजेश पाटील, विनोद देशमुख, जे.आर. आमले, अशोक शिंदे, किरण बच्छाव, चंद्रकात कापसे, दीपक सरूयवशी, वाल्मिक पाटील, संतोष पाटील, भिमराव मराठे, उज्‍जवल पाटील, उमेश पाटील, खुशाल चव्हाण, प्रफुल्ल पाटील, राजेश पाटील, प्रदीप रावसाहेब पाटील, मनोहर पाटील, ज्ञानेश्वर रामदास पाटील, अॅड.कुणाल पवार, अॅड.सचिन पाटील, योगेश पवार, राम पवार आदी.पोलिसांचा तगडा बंदोबस्तया आंदोलनासाठी उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रशिक्षणार्थी आयपीएस मनिष कलवानिया, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक डॉ.संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक कुबेर चवरे, रामानंदचे प्रवीण वाडिले, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल देशमुख, सहायक निरीक्षक प्रदीप देशमुख, अरविंद भोळे, उपनिरीक्षक राजेश घोळवे, दिलीप पाटील, गजानन राठोड, सुप्रिया देशमुख, मनोज वाघमारे यांच्यासह शहर व जिल्हा वाहतूक, रामानंद, जिल्हा पेठ तसेच मुख्यालयाच्या कर्मचा:यांचा ताफा तैनात होता.