शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अनेक एजंट परागंदा

By admin | Updated: September 12, 2014 15:07 IST

साई क्रेडिट अँण्ड मार्केटिंग कंपनीचे अनेक एजंट फरार झाले आहेत. गुंतवणूकदार त्यांच्या घरी चकरा मारत आहेत.

नंदुरबार : साई क्रेडिट अँण्ड मार्केटिंग कंपनीचे अनेक एजंट फरार झाले आहेत. गुंतवणूकदार त्यांच्या घरी चकरा मारत आहेत. पोलिसांकडे कुणी फिर्याद देत नसल्यामुळे पोलीस आता स्वत:हून तपास सुरू करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या कंपनीत दामदुप्पटच्या आमिषाने अनेक शिक्षक, प्राध्यापकांनीही लाखो रुपये गुंतवल्याचे आता पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे ही रक्कम कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

नंदुरबारात वर्षभरापूर्वी साई मार्केटिंग नामक कंपनी सुरू करण्यात आली होती. पुणे येथे मुख्य शाखा असल्याची बतावणी करून कंपनीने परदेशीपुरा भागात कार्यालय सुरू केले. कंपनीत पैसे गुंतविण्यासाठी आकर्षक स्वरूपात जाहिरात करण्यात आली. त्यासाठी एजंट नेमण्यात आले. एजंटांनाही घसघशीत कमिशन देण्यात आले. सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदारांना नियमित परतफेड मिळू लागल्याने पैसे गुंतविणार्‍यांची संख्या वाढत गेली. कुणी शेकडा, कुणी हजार, तर कुणी लाखाच्या पटीत पैसे गुंतवू लागले. अखेर जे व्हायचे ते झालेच. संबंधित कंपनीचालक गेल्या आठवड्यात कार्यालयाला कुलूप लावून पसार झाला. गुंतवणूकदार हात चोळत बसले.
ज्या गुंतवणूकदारांनी ज्या एजंटाकडे पैसे गुंतवले होते त्यापैकी अनेक जण शहरातून निघून गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या घरी काहींनी तगादा लावला असता अनेकांच्या घरी ही बाब माहिती नसल्याचे सांगण्यात आले. आमचा संबंधही नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हतबल झाले आहेत. पोलिसांकडे तक्रार करावयाची म्हटली म्हणजे पोलिसांच्या तपासाचे नुसतेच लचांड मागे लागेल म्हणून काही जण शांत बसून आहेत. 
या कंपनीत अनेक शिक्षक, प्राध्यापक व वरिष्ठ अधिकारी असलेल्यांनीही पैसे गुंतवले आहेत. त्यांनी लाखांच्या पटीत पैसे गुंतवल्याची चर्चा आहे. एका शिक्षकाने आठ लाख रुपये गुंतवले होते. तो शिक्षक कोण? याबाबत शहरात चर्चा आहे. नोकरदारांप्रमाणे रोजंदारीवर काम करणारे, व्यवसाय करणार्‍यांनीही हजारो रुपये गुंतवले आहेत. त्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे.
कुणी तक्रार देण्यास पुढे येत नसल्यामुळे पोलिसांनी स्वत:हून तपास करण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत लवकरच मूळ सूत्रधारापर्यंत पोहचण्यासाठी पोलीस प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात आले.
संघटित होणार
दरम्यान, साई मार्केटिंगमध्ये ज्यांचे पैसे गुंतले आहेत असे गुंतवणूकदार एकत्र येऊन संघटित लढा देणार असल्याचे समजते. याबाबत कोण पुढाकार घेईल यावर मात्र कुणीही बोलण्यास तयार नाही. वैयक्तिकऐवजी संघटित लढय़ानेच याप्रकरणी यश येईल याबाबत गुंतवणूकदारांमध्ये एकमत झाले आहे.■ गुंतवणूकदारांमधील चर्चेनुसार संबंधित कंपनीचालक स्थानिक ठिकाणचा गुंतवलेला पैसा नाशिक येथील केबीसी कंपनीत दामदुप्पटसाठी टाकत होता. मात्र, केबीसीचेही दिवाळे निघाल्याने या कंपनीचा पैसा बुडाला. परिणामी गुंतवणूकदारांना देण्यासाठी पैसे शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे साई मार्केटिंग कपंनीचे दिवाळे निघाल्याची चर्चा आहे. जोपर्यंत केबीसी नियमित चालू होती तोपर्यंत साई मार्केटिंगही नियमित परतफेड करीत होती. केबीसी बंद पडली आणि साई मार्केटिंगचीही चक्रे उलटी फिरू लागल्याची चर्चा गुंतवणूकदारांमध्ये आहे.