लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील मानसी संजय मराठे हिची विद्यापीठस्तरीय समाजकार्य अभ्यास मंडळाच्या समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एप्रिल-मे २०२० या कालावधीत झालेल्या बी.एस.डब्ल्यू तृतीय वर्ष आणि एम.एस.डब्ल्यू द्वितीय वर्ष या अंतिम परीक्षेचे आयोजन हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. या परीक्षेच्या निकालाच्या गुणवत्ता यादीमध्ये धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाच्या बी.एस.डब्ल्यू तृतीय या वर्गामधील मानसी संजय मराठे ही पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. आता नुकतीच तिची विद्यापीठस्तरीय समाजकार्य अभ्यास मंडळ समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून निवड झालेली आहे.
विद्यार्थ्यांचा सत्कार
तसेच एम.एस.डब्ल्यू द्वितीय वर्ष या वर्गातील लीना जगताप या विद्यार्थिनीने गुणवत्ता यादीमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आहे. दरम्यान, या यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींचा संस्थेचे अध्यक्ष शिरीष चौधरी, संस्थेचे उपाध्यक्ष सुनील पाटील, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. प्रमोद चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आयटी समन्वयक डॉ. प्रशांत भोसले उपस्थित होते.