शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मानेला पिस्तूल लावून यावलमध्ये सराफ दुकानातून साडेबारा लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 18:00 IST

सराफ दुकानातून साडेबारा लाख लुटल्याची थरारक घटना बुधवारी भरदुपारी घडली.

ठळक मुद्देयावल शिवसेना शहरप्रमुखाची पेढी दोन गावठी कट्टे जप्तसाडेबारा लाखांचा ऐवज लुटला

डी.बी. पाटीलयावल, जि. जळगाव : गजबजलेल्या वस्तीत असलेल्या सराफ दुकानाच्या मालकाच्या मानेला पिस्तूल लावून जवळपास साडेबारा लाखांचा ऐवज लुटण्यात आला. ही थरारक घटना बुधवारी भरदुपारी एक वाजता यावल येथील कोर्ट रस्त्यावर घडली. या सराफी दुकानाचे संचालक जगदीश कवडीवाले हे शिवसेनेचे शहरप्रमुख आहेत.या दुकानातून दरोडेखोरांनी १२ लाख रुपये किमतीचे २४० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच ५५ हजार रुपयांची रोकड लुटून नेली. कोर्ट रस्त्यावर बाजीराव काशिदास कवडीवाले या सराफ दुकानात बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी प्रवेश केला. त्यापैकी एकाने संचालक जगदीश कवडीवाले यांच्या मानेवर गावठी कट्टा लावला आणि दुकानातील शोकेस फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे सुमारे साडेबारा लाखाचा ऐवज लुटून नेला.एकाच मोटार सायकलवरून चौघे पसारकाम होताच चारही चोरट्यांनी दुकानाबाहेर लावलेल्या एकाच मोटारसायकलवर बसून पळ काढला. घटनास्थळापासून सुमारे शंभर फूट अंतरावर रस्त्यामध्ये गाय बसलेली होती. त्यावेळी दरोडेखोरांनी मोटारसायकल रस्त्याच्या बाजूने नेण्याचा प्रयत्न केला असता घाईतच त्यांची मोटारसायकल स्लिप झाल्याने ते खाली पडले. त्यावेळी त्यांच्याकडील दोन देशी कट्टे खाली पडले. तेव्हा शेजारीच राहत असलेले राजे श्रावगी यांनी बाहेर येऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका दरोडेखोराने दुसरा कट्टा श्रावगी यांच्या मानेला लावून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने गोळी सुटली नाही. मात्र दोन गावठी कट्टे पोलिसांनी जप्त केले आहेत. यापैकी एका कट्ट्यात पाच जिवंत काडतुसे तर दुसऱ्या कट्ट्यात एक जिवंत काडतूस होते.हा प्रकार जवळच असलेल्या आयडीबीआय बँकेच्या रांगेत असलेल्या काही ग्राहकांनी पाहिला, त्यांनी या दरोडेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र यशस्वीपणे पसार होण्यात यशस्वी झाले.भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांसह शहरवासीयांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी भेट दिली आणि चोरट्यांचा लवकर तपास करण्यात येईल, असे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYawalयावल