शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

‘मानस’ ने वाजणार जळगावात पुरुषोत्तम करंडकाची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 19:01 IST

मू.जे.महाविद्यालयाचानाट्यशास्त्र विभाग व पुणेयेथीलमहाराष्टÑीय कलोपासक मंडलयांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते  १८ सप्टेंबर दरम्यान शहरातील ला.ना.सार्वजनिकविद्यालयातीलभैय्यासाहेब गंधे सभागृहात ‘पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकीका’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे१६ ते १८ सप्टेंबर दरम्यान आयोजनखान्देशसह मराठवाड्यातील १५ एकांकीका होणार सादरमू.जे.महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाने या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी

लोकमत आॅनलाईन,

जळगाव-दि.९, मू.जे.महाविद्यालयाचानाट्यशास्त्र विभाग व पुणेयेथीलमहाराष्टÑीय कलोपासक मंडलयांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते  १८ सप्टेंबर दरम्यान शहरातील ला.ना.सार्वजनिकविद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात ‘पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकीका’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या  स्पर्धेसाठी शनिवारी लॉट्स पाडण्यात आले. गोदावरी इन्स्टीटयूट आॅफ मॅनेजमेंटच्या ‘मानस’ या  एकांकिकेने पुरुषोत्तम करंडकाची पहिली घंटा १६रोजीवाजणार आहे. यास्पर्धेतखान्देशसहमराठवाड्यातील१५एकांकीकासादरहोणारआहे.

गेल्या वर्षापासून  मू.जे.महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाने या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी घेतली असून, या स्पर्धेत जळगावयेथीलउत्तर महाराष्टÑ विद्यापीठ, औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गतयेणाºया महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेत १५ संघानी आपला  प्रवेश निश्चित केला आहे. शनिवारी मू.जे.महाविद्यालयात महाराष्टÑीय कलोपासक यांचे प्रतिनीधी राजेंद्र  नांगरे, केसीईचे सभासद शशिकांत वडोदकर, प्रा.चारुदत्त गोखले, मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत  लॉट्स पाडण्यात आले. यावेळी स्पर्धेत सहभागी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी आणि प्राध्यापक  उपस्थित होते. १६ सप्टेंबर रोजी  दुपारी ४ वाजता स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. पहिल्या दिवशी चार एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. तर १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता स्पर्धेचा निकाल जाहीर  होणारआहे.

पुरुषोत्तम करंडकाचे वेळापत्रक१६ सप्टेंबर महाविद्यालयाचे नाव  - एकांकिका - वेळगोदावरी इन्स्टीटयूट आॅफ मॅनेजमेंट रिसर्च, जळगाव - मानस - सायंकाळी ५ वाजताकेसीईचे आय.एम.आर.महाविद्यालय, जळगाव - स्टॅच्यूू - ६ वाजतापंडित जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर - अल्पविराम - रात्री७  वाजताडॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव- च्या बही -रात्री ८ वाजता

१७  सप्टेंबर  पी.के.कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ  - पुरुष - सकाळी १० वाजताउमवि समाजकार्य विभाग, जळगाव - कॅफे शुभमंगल - ११ वाजताएम.डी.पालेशा  कॉमर्स कॉलेज, धुळे - ब्रेकअप के बाद - दुपारी १२  वाजतागुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव -  कबुल है - दुपारी २ वाजतापु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ -  एक्स -  ३ वाजताप्रताप महाविद्यालय, अमळनेर - रावीपार - ४ वाजतानॉर्थ महाराष्टÑ नॉलेज सिटी, बांभोरी - उंच माझा झोका ग.. - सायंकाळी ५ वाजताशिवाजी विद्या प्रसारक कला,वाणिज्य महाविद्यालय, धुळे- पंचावन्न आणि  साठीतले प्यादे - ६ वाजता

१८ सप्टेंबर देवगिरी  महाविद्यालय, नाट्यशास्त्र विभाग, औरंगाबाद  - तिच्यासाठी वाट्टेल ते - दुपारी १२ वाजताजवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय,  औरंगाबाद - गार्गी..अजुन जिवंत आहे - दुपारी ३ वाजताशासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद - नाटक - दुपारी ४ वाजता